आरोग्य विभाग राबवणार राज्यव्यापी ‘बालआरोग्य तपासणी मोहीम’
आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची घोषणा

थिंक टँक : नाना हालंगडे
राज्यातील १८ वर्षे वयोगटाखालील सुमारे तीन कोटी बालकांच्या सर्वांगिण आरोग्याची तपासणी करण्याची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शून्य ते १८ वयोगटातील सर्व बालकांच्या आरोग्याची सर्वांगिण तपासणी करण्याची संकल्पना मांडली असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाकांक्षी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकांच्या शाळा तसेच खासगी शाळा आणि अंगणवाड्यातील बालके अशी सुमारे दोन कोटी ९२ लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने ही मोहीम राबविण्यासाठी नियोजन केले असून यात आरबीएसकेचे डॉक्टर, भरारी पथकांचे डॉक्टर,समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने व्यापक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालयांपासून प्राथिमक आरोग्य केंद्रांपर्यंतच्या सर्व स्तरांवर ही तपासणी केली जाणार असून महापालिका पातळीवर पालिका आयुक्तांच्या माध्यमातून महापालिका रुग्णालयांच्या मदतीने तपासणी मोहीम करण्यात येणार आहे.
मुलांच्या डोळ्यांची, मौखिक आरोग्य, रक्तदाब तपासणी
साधारणपणे प्रत्येक वैद्यकीय अधिकारी या मोहीमेत रोज सुमारे १५० मुलांच्या आरोग्याची तपासणी करेल. यात मुलांची डोळ्यांच्या तपासणीपासून मौखिक आरोग्य, रक्तदाब तपासणीपासून विविध आजारांचा विचार करून तपासणी करण्यात येणार आहे. यात शासकीय शाळांमधील एक कोटी २४ लाख ९५ हजार १५७ मुलांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार असून खाजगी शाळांमधील ५३ लाख ९५ हजार ३८० विद्यार्थी, तर अगंणवाड्यांमधील ७३ लाख ६३ हजार १५६ बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बालगृहे व अनाथालयातील १० हजार १२५ मुले तर अंध व दिव्यांग अशी ३६,६३९ मुलांची तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शाळाबाह्य आठ लाख ३१ हजार १०१ मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा संकल्प आहे.
आठ आठवड्यांसाठी ही मोहीम राबिवण्यात येणार
साधारणपणे आठ आठवड्यांसाठी ही मोहीम राबिवण्यात येणार असून यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. राज्यातील ग्रामीण भागातील १०,७८६ उपकेंद्रे ,१८२८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६४ ग्रामीण रुग्णालये, ९१ उपजिल्हा व जिल्हा रुग्णालये याच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील २०८२ डॉक्टर, भरारी पथकांतील २६० डॉक्टर तसेच ८१५१ ,समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या शिवाय ६२ हजार आशा कार्यकर्त्या व साडेचार हजार अर्धपरिचारिका आणि एक लाखाहून अधिक अंगणवाडी सेविकांही या मोहीमेत काम करणार आहेत. यात बालकांच्या सर्वांगिण आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून वजन, उंची, कुपोषित, तीव्र कुपोषित, डोळ्यांचे आजार, दंतविकार, हृदयरोग तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेप्सी, ऑटिझम आदीचा समावेश असणार आहे.
यापूर्वी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्यव्यापी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली होती. यात सुमारे चार कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अशी संकल्पना घेऊन ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर ही योजना आहे.
राज्य कृती दलाची स्थापना
आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलात महिला व बालविकास विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, सामाजिक न्याय तसचे शालेय शिक्षण, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागाचे सचिव तसेच आरोग्य विभागाचे आयुक्त, संचालक, अन्य विभागाचे आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
- “नेत्यावर बंदूक रोखण्यासारखं काही नसलं की बायकोच्या मागे लागतात” : अमृता फडणवीस
- “आपल्या समाजात आधीपासून LGBTQ समूह” : मोहन भागवतांचं मोठं विधान
- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन : ‘आधारस्तंभ’?
- काय सांगता? मंगुड्यातील या गावात शेतीला बांधच नाही
- रासप सर्व निवडणूका स्वबळावर लढणार
- “उर्फी के अंडरवेअर मे छेद है.. चित्राताई ग्रेट है”