आबासाहेब, माणदेशी माणसांचा घ्या शेवटचा लाल सलाम

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love
  • माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि.३१: सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, समाधान आवताडे, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुमनताई पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगोल्याच्या नगराध्यक्ष राणीताई माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सर्वश्री अण्णा डांगे, प्रा राम शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सर्वश्री रामहरी रुपनवर, राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, बाळाराम पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उत्तमराव जानकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

 

गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना-पालकमंत्री भरणे
यावेळी पालकमंत्री श्री. भरणे यांनी बोलताना सांगितले की, गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण राज्यासह, जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नेते आणि सामान्यांचे नेते, अशी ओळख त्यांची होती. तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

जेष्ठ सुपूत्र पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला.

त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री श्री भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, प्रशांत परिचारक, आमदार सुमनताई पाटील, अनिल बाबर, अण्णा डांगे, रामहरी रुपनवर, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, वाळव्याचे वैभव नाईकवडी, बाबा कारंडे यांनी गणपतराव देशमुख यांच्याबद्दल शोक भावना व्यक्त केल्या.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका