आबासाहेबांचे विचार पुढे नेऊ : डॉ. निकिता देशमुख
वाढेगावात हळदी-कुंकू कार्यक्रम
थिंक टँक / नाना हालंगडे
भर उन्हात महिलांची उपस्थिती पाहिल्यावर व महिलांचा उत्साह बघता माझी येणाऱ्या काळात अजून काही महिलांसाठी समाजपयोगी काम करण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. महिलांच्या उत्साहामुळे स्व. आ. भाई गणपतराव देशमुख यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची ताकद मिळते, असे प्रतिपादन डॉ. निकिता बाबासाहेब देशमुख यांनी केले.
वाढेगाव येथे वाढेगाव पंचायत समिती गणातील महिलांचा हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून व उपस्थितीत संपन्न झाला. पंचायत समिती गणातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सदर कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा व वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले.व विजेत्या महिलांना चांदीच्या नथी,पैठणी इत्यादी आकर्षक भेटवस्तू देऊन महिलांना प्रोत्साहित करण्यात आले होते.
महिला वर्गाला मार्गदर्शन करताना निकिताताई यांनी महिलांनी चुल व मुल या संकल्पनेतुन आणखी बाहेर येण्याचे आवाहन केले. महिलांवरती कुटुंबाचा गाडा चालवत असताना फार मोठी जबाबदारी असते.
त्या महिलेला मुलांना संभाळणे, पाहुण्यांचा पाहुणचार बघणे,घरातील जेष्ठांची सेवा करणे, स्वयंपाक करणे,हे करुन काही महिला शेतामध्ये राबतात, व्यवसायामध्ये मदत करतात काही महिला नोकरीही करतात अशा धक्काधकीच्या जिवनक्रमामध्ये महिलांना थोडासा विरंगुळा मिळावा व महिलांमध्ये असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. सौ. निकिताताई देशमुख पुढे म्हणाल्या की, कुटुंबातील महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महिला जर निरोगी तंदुरुस्त आसेल तर कुटुंब निरोगी तंदुरुस्त राहते. वाढेगाव पंचायत समिती गणातील प्रमुख महिलांचे सहकार्य व सहभाग पाहुन मला ही स्व.आबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याची समाज सेवा करण्याची ऊर्जा मिळते. भर उन्हात महिलांची उपस्थिती पाहील्यावरती व महिलांचा उत्साह बघता माझी येणाऱ्या काळात अजून काही महिलांसाठी समाजपयोगी काम करण्याची इच्छा प्रबळ झाली आहे.
वाढेगाव पंचायत समिती गणातील जे आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,आजी माजी सरपंच व सदस्य तसेच विविध संस्थांचे चेअरमन व्हा चेअरमन व सदस्य यांचे ही मला बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.. ज्या महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला त्यांचे अभिनंदन व ज्या महिला बक्षिसांच्या मानकरी ठरल्या त्या महिलांचे ही अभिनंदन केले.