ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

आता मिळणार गोवरची लस?

केंद्र सरकारच्या बैठकीत मोठा निर्णय; सहा वर्षाच्या बालकाचा समावेश

Spread the love

थिंक tank/ नाना हालंगडे
महाराष्ट्रात गोवर साथीच्या (Measles) आजाराने थैमान घातलंय. लहान मुलांनाही मोठ्याप्रमाणात या आजाराची लागण होताना दिसतोय. यामध्ये मुंबईनंतर (Mumbai) ठाण्यातील भिवंडीमध्ये गोवर, रुबेला आजाराने कहर केलाय. गोवरच्या साथीचं गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात एक बैठक बोलवाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.तर सोलापूर जिल्ह्यातील सहा जणांनाही याची लागण झाली आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माहिती दिली की, या बैठकीत एक बालक दुसऱ्यांच्या संपर्कात येतायत का ते पाहतोय. ज्या ठिकाणी लसीकरण झालं नसेल तिथे ते करणं गरजेचं आहे. बालकांना लस देण्याचं काम सुरू आहे. 6 महिन्याच्या बालकांना लस देता येईल याचा विचार सुरू आहे. यावर एक्सपर्ट कमिटी अभ्यास करतेय. ही समितीच याबाबत निर्णय देईल. शिवाय याबाबत जागरूकता होणं गरजेचं आहे.”

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, “गोवरसंदर्भात अनेक ठिकाणी लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे सध्या हे वाढवणं गरजेचं आहे. 84 टक्के लसीकरण काही ठिकाणी झालंय. काही राज्यात 60 टक्के लसीकरण झालं आहे.”

*मुंबईमध्ये गोवरचं थैमान
दरम्यान काल मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती हाती आली आहे. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारा दरम्यान मुंबईत मृत्यू झालाय. त्यामुळे आता मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली 11 वर पोहोचली आहे. अशातच आता मुंबईत सध्या गोवर रूग्णांची संख्या (Total Patient) पोहचली 220 वर पोहचली आहे.

गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांचं (measles child) आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे तुमच्या लहानग्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (vaccine) आणि काळजी घ्या, असं आवाहन देखील करण्यात आलंय.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका