आता नववर्षात मिळणार लस
15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी असेल नियोजन
अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविरोधातील लढाई आणखी मजबुत होईल.
थिंक टँक न्युज नेटवर्क/ नाना हालंगडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. आपण वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. आपले वैज्ञानिक कोरोनावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून लसीकरणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. ते कोरोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करत होते. (PM Modi on Omicron and Corona Vaccination for children)
*करोना संपलेला नाही, सतर्कता आवश्यक
मोदी म्हणाले, अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविरोधातील लढाई आणखी मजबुत होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंताही दूर होईल. या शिवाय कोरोना वॉरियर्सनाही लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे.
हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना मिळणार प्रिकॉशन
15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांबरोबरच कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देणाऱ्या हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन म्हणून 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात होईल, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.
*आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याचसोबत नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.
३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान, ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.
*दहा राज्यांत केंद्रीय पथके
केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
करोनासह ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्णय
ओमायक्रॉनसह मूळ करोना रुग्णांची संख्या अधिक आढळणाऱ्या आणि लसीकरणचा वेग कमी असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मत्रालयाने शनिवारी दिली.
केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. विविध वृत्तवाहिन्यांची वृत्ते, राज्य सरकारांच्या अंतर्गत आढाव्यातील माहितीवरून करोना बाधितांची संख्या, मृतांचे प्रमाण आणि ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढत असल्याचे आढळले. या दहापैकी काही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेगही सरासरी राष्ट्रीय वेगापेक्षा कमी असल्याचे आढळले. त्यामुळेच दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
ही पथके राज्यात तीन ते पाच दिवस मुक्काम करतील आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांबरोबर काम करतील. करोना व्यवस्थापनात राज्ये आणि जिल्हा प्रशासनांना ही पथके मदत करतील, असे सांगण्यात आले.
दरम्यान, दिल्लीत नाताळ आणि नववर्षाच्या स्वागत काºयक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र गोवा आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढणाऱ्या केरळने मात्र अद्याप तसे निर्बंध लागू केलेले नाहीत.
देशातील करोनाबाधित…
गेल्या २४ तासांत देशात ७,१८९ नवे करोना रुग्ण आढळल्याने एकूण संख्या तीन कोटी ४७ लाख ७९ हजार ८१५ झाली. सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती सध्या ७७,०३२ आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४ लाख ७९ हजार ५२० वर पोहोचली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचा दर ९८.४० असून तो गेल्या मार्चनंतरचा सर्वाधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
देशात ओमायक्रॉनचे ५० टक्के बाधित लसवंत
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या शनिवारी ४१५ झाली. यापैकी १८३ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला असून त्यापैकी जवळजवळ ५० टक्के म्हणजे ८७ रुग्णांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.