आता ‘काडी लावणे’ही महागले
चौदा वर्षांनंतर काडीपेटीची दरवाढ, १ डिसेंबरपासून दरवाढ
- पुरोगामी युवक संघटना पुरोगामी विचारांची पोकळी भरून काढेल : डॉ. बाबासाहेब देशमुख
- (वाचा बेधडक मुलाखत)
सांगोला/नाना हालंगडे
एकीकडे पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आणि खाद्य तेलाच्या किंमतींचा भडका उडला असतानाच काडीपेटीची (matchboxes) किंमतही वाढली आहे. तब्बल १४ वर्षानंतर काडीपेटीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. एक रुपयांना मिळणारी काडीपेटी आता दोन रुपयांना मिळणार आहे. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू होईल.
(matchboxes) पाच प्रमुख उद्योगांनी सर्वसहमतीने दरवाढीचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काडीपेटीच्या दरात २००७ मध्ये वाढ करणय्ता आली होती. यावेळी ५० पैशांना मिळणारी काडीपेटीचा दर एक रुपया करण्यात आला होता.
आता पुन्हा एकदा दरवाढ करण्यासाठी शिवकाशी येथे ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसची बैठकी झाली. यामध्ये एक रुपयांनी दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारण स्पष्ट करताना उत्पादकांनी स्पष्ट केली की, काडीपेटी तयार करताना १०पेक्षा अधिक प्रकारच्या कच्चा माल आवश्यक असतो. मागील काही दिवसांमध्ये कच्चा मालाच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या दरात विक्री करणे अशक्य आहे.
तसेच डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळेही उद्योगावर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या उद्योगामध्ये खार छाप काडीपेटी सर्वाधिक फेमस आहे. सर्व हवामानात ही काडीपेटी चालते. यातील प्लास्टिक काडीपेटीला सर्वाधिक मागणी आहे.
हिची किंमत ही आत्ता 3 रूपये इतकी होणार आहे. हीच काडीपेटी गरीबापासून श्रीमंता पर्यंत सर्वांना उपयोगी पडीत आहे.