थिंक टँक / नाना हालंगडे
२२ डिसेंबर रोजी सुर्य जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनारी जगभरातील लोकं गर्दी करतात आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे उत्साहाने स्वागत करतात. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीची गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखलेले असतात.
ग्रेगरी दिनदर्शिकेत २२ डिसेंबर हा वर्षातील ३५५वा किंवा लीप वर्षात ३५६वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते. आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. वास्तविक पृथ्वीच्या सू्र्यापासूनच्या अंतरात कायम होणाऱ्या बदलांमुळे हा फरक पडत असतो. पृथ्वी ही कायम सूर्याच्या बाजूने थोडीशी कललेली असते. त्यामुळे बारकाईने निरीक्षण केल्यास वर्षातल्या प्रत्येक दिवशी सूर्याची उगवण्याची जागा किंचित बदलत असते.
२२ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायण संपून उत्तरायण सुरु होतं. याचा अर्थ सूर्याची किरणं पृथ्वीवर सर्वाधिक तिरपी पोहोचत असतात आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात ती जवळपास सरळ पडतात. त्यामुळे पृथ्वीच्या इतर भागात दिवस खूप लहान होतो आणि रात्र मोठी होते. त्यानंतर लगेचच सूर्याचं उत्तरायण सुरु होतं. याचाच अर्थ पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता हळूहळू दक्षिणेकडे कलू लागते. याचाच परिणाम म्हणून २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी दिवस आणि रात्र हे समान म्हणजेच १२ तासांचे असतात.
पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत : फिरत असून २४ तासात दिवस – रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत : भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जून नंतर वर्षातील १ ९ ३ दिवस उरले असतात.
२१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो . पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते.
त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो , नंतर काही भाग निरकस दिशेत येतो . त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो.
२२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो . या बिंदूला ‘ विंटर सोल्सस्टाईल ‘ असे म्हणतात . या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते . दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो . पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते . याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो.
कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो . पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात . आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे . यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो , याला शरद संपात बिंदू असे म्हणतात , या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो.
हेही वाचा