आगामी निवडणुकीत वंचित-एमआयएम आघाडीचे असदुद्दीन ओवेसींनी दिले संकेत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खळबळ!

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून राज्यात सक्षम विरोधी पक्षाची आठवण करून देणारे एमआयएमचे अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवेसींनी आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा वंचितसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.

औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तरे देताना हे संकेत मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची पत्रकार परिषद पार पडली.
राजकारणात काहीही अशक्य नसतं; कधीही काही होऊ शकतं या सूत्रानुसार जर वंचितची तयारी असेल तर आम्ही जरूर आघाडी करू असेही खा. ओवेसी म्हणाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनीअरींगचा वापर करत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षासोबत तसेच इतर छोट्या संघटनांसमवेत संधान साधत राज्यातील भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांना विविध ठिकाणी तुल्यबळ लढत दिली होती. सर्वात जास्त फटका राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ४० लाखाच्या वर मते मिळवत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ने मोठी राजकीय ताकद दाखवून दिली होती. मात्र अंतर्गत कलहामुळे ही युती २०१९ च्या विधानसभेला कायम राहिली नाही. विधानसभेला वंचित आणि एमआयएम वेगळे लढले.

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आंबेडकर आणि ओवेसी एकत्रितपणे लढू शकतील असा अंदाज ओवेसी यांच्या संकेतांवरून बांधला जात आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका