आकाश ठोसरने जिंकली सोलापूरकरांची मने
आपले प्रेम विसणार नसल्याची दिली ग्वाही
सोलापूर : ‘सैराट’फेम परश्या उर्फ आकाश ठोसरच्या (Actor Akash Thosar) हस्ते सोलापूरातील हॉटेल ध्रुवचे उदघाटन बुधवारी रात्री झाले. यावेळी परश्याला पाहण्यासाठी चाहत्यांसाठी गर्दी केली होती. त्याची झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते. आपण ‘सैराट’ (Sairat Marathi Movies) रिलिज झाल्यापासून माझ्यावर खूप प्रेम केले. हे प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही, असे म्हणत त्याने सोलापूरकरांची मने जिंकली.

सोलापूरातील पूर्वभागातील हॉटेल ध्रुव रॉयल या एसी फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सहाला ‘सैराट’फेम आकाश ठोसर याच्या उपस्थितीत होणार होते. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच आकाशच्या चाहत्यांनी त्याची झलक पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. सातच्या सुमारास बाऊन्सर व पोलिस बंदोबस्तात आकाशचे आगमन झाले. चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

गर्दीतून वाट काढत तो कार्यक्रमस्थळी पोहोचला. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) व आकाश ठोसर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक अरविंद शिंदे, अनिल शिंदे, अतिश शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
- हेही वाचा : विद्यापीठ युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद महाविद्यालयाकडे
- वारकऱ्यांना मिळणार दरमहा पाच हजार मानधन
- काय सांगता? फक्त ५०० रुपयांत Jio चा नवा स्मार्टफोन!
- ‘सैराट’फेम आकाश ठोसर उद्या सोलापूरात
- केंद्रीय विद्यापीठांत ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती
भूषण मंजुळेंनी माझ्यातील कलाकार हेरला : ठोसर
चाहत्यांशी संवाद साधताना आकाश ठोसर म्हणाला की, मीही तुमच्यासारखाच सामान्य जीवन जगत होतो. एकेदिवशी रेल्वे स्टेशनवरून जात असताना भूषण मंजुळे यांनी मला पाहिले व सैराट चित्रपटासाठी नागराज मंजुळे (Director Nagraj Manjule) यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली. त्यांच्यामुळेच मी आज यशोशिखरापर्यंत पोहोचू शकलो. सोलापूरकरांनी आजवर खूप प्रेम दिलंय. हे प्रेम असेच राहू द्यावे.