ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

अशोक चव्हाणांची मुलगी राजकारणात? चव्हाण यांनीच दिलं उत्तर

Spread the love

“त्यांना राजकारणात आणण्याची मी भूमिका घेतलेली नाही. त्यांची इच्छा असेल तर त्या राजकारणात येतील. इच्छा नसेल तर राजकारणात येणार नाहीत. माझी यामध्ये कोणतीही भूमिका नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा,” असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

थिंक टँक : नाना हालंगडे 

शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त आपला सहभाग नोंदवला. नांदेडमध्ये असताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या यात्रेचे उत्तम नियोजन केले. या यात्रेदरम्यान अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया यादेखील या यात्रेत सहभागी झाल्या. याच कारणामुळे अशोक चव्हाण आपल्या मुलीला राजकारणात आणण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय. याच चर्चेवर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझा तसा कोणताही विचार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

ते ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. महाराष्ट्रात असताना या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“त्यांना राजकारणात आणण्याची मी भूमिका घेतलेली नाही. त्यांची इच्छा असेल तर त्या राजकारणात येतील. इच्छा नसेल तर राजकारणात येणार नाहीत. माझी यामध्ये कोणतीही भूमिका नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा,” असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले की, “मी माझ्या मुलीला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण आजची पिढी सल्ला घेण्याच्या मानसिकतेत नाही. ही पिढी कोणाचंही ऐकत नाही. भारत जोडो यात्रा पाच दिवस नांदेड जिल्ह्यात होती. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही या यात्रेसाठी उत्तम नियोजन केले होते. या यात्रेत माझे कुटुंबीयदेखील सहभागी झाले होते. अनेक लोकांसोबत माझ्या मुलीदेखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. याचा अर्था माझ्या मुलींना राजकरणात आणण्याची माझी भूमिका होती, असा होत नाही,” असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

भारत जोडो यात्रेमध्ये अशोक चव्हाण यांची श्रीजया ही धाकटी कन्या दिसली होती. त्यानंतर श्रीजया राजकारणात सक्रिय होणार का? असे विचारले जात होते. यावरच अशोक चव्हाण यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. “मी माझ्या मुलीला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही.असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका