अशी साजरी करा कोजागरी पौर्णिमा
सांगोला/ नाना हालंगडे
पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शुध्द पौर्णिमा म्हणजे “कोजागरी पौर्णिमा”. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत, खेळत जागरण करतात, त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.
हा उत्सव आश्वीन शुध्द पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२.०० ते १३.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मि, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा (दूध) नैवैद्य लागतो.
पूजाविधी मांडणी
मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर.
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी.
२) कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा / गडवा, त्यात पाणी भरून त्यावर आंब्याच्या पानांचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा.
४) चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून बनवावा._
अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२.३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणांत ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात.
५) १२.३० वाजता पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवतांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुलसीपत्र तोडून ठेवावे. दुधात एक तुलसीपत्र टाकावे व त्याचा नैवेद्य अर्पण करावा, प्रार्थना म्हणावी, “ऋण रोगादी दारिद्र्यम् अपमृत्यु भय । शोक मनस्ताप। नाशयंतु मम सर्वदा ।।”
नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजेला वापराव्यात. १२ ते १२.३० या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी. त्यात.
- श्री स्वामी समर्थ मंत्र ११माळा जप.
- श्री लक्ष्मी गायत्री मंत्र १माळ जप.
- श्री विष्णु गायत्रीमंत्र १ माळ जप.
- श्री कुबेर मंत्र १ माळ जप.
- १६ वेळा श्री सूक्त.
- श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा.
गीतेचा १५ वा अध्याय १ वेळा…. एवढी सेवा करावी. (सहकुटुंब एकत्रीत केली तर सर्व सेवा वेळेत होते.)
हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे ‘श्री’.लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणुस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळु आहे, कृपाळु आहे, हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.
- ‘वंचित’ला आणखी एक धक्का, प्रदेश महासचिवाचा भाजपात प्रवेश
- सांगोल्याच्या डाळिंबाला वातावरणातील बदलाचा फटका
- आमदार निलेश लंके यांच्यावर येतोय मराठी चित्रपट
या मोठ्या बहीणीस ‘अक्काबाई’ म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे, हे ती पहाते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे सेवा-उपासना, जागरण करतात त्यांना सुख-समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? को जागर्ती? यावरून या पौर्णिमेला “कोजागरी” हे नांव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो. आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पहात असतो. वारंवार तो “कोजागर्ती” असे विचारतो. यावरून हे नांव रूढ झाले.