अवकाळीने ज्वारीचे मोठे नुकसान; दर गगनाला भिडणार

जाणून घ्या ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व

Spread the love
ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

सांगोला/ नाना हालंगडे

रब्बी हंगामातील शाळू म्हणजेच ज्वारीचा अवकाळी पाऊसाने अक्षरशः सुपडासाफ झाला आहे. त्यामुळे बळीराजा डोक्याला हात लावून बसलेला आहे. अवकाळीने ज्वारीचे मोठे नुकसान झाले असून दर गगनाला भिडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


सांगोला तालुक्यात 38 हजार हेक्टरच्या आसपास याची पेरणी झाली आहे. पण गत वर्षाप्रमाणे या वर्षेही ही ज्वारी कमी पडणार आहे. त्यामुळे ज्वारीचे व कडब्याचेही दर गगनाला भिडणार असल्याच्ये पहावयास मिळणार आहे. याच ज्वारीचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आपण जाणून घेवूया.

“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.”

“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”

“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”

“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”

“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले…

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात.

जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

ज्वारीचे फायदे
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाच सणावाराला उपयोग करा.
(स्त्रोत: संकेतस्थळे)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका