अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही बाप्पा मोरयाचा गजर

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Spread the love

देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आलीय. बाप्पांची प्रतिष्ठापना अमेरिकेतील हिंदू बांधव वर्षानुवर्षांपासून करीत असले तरी यंदाचा गणेशोत्सव त्यांच्यासाठी वेगळाय. विशेष बाब म्हणजे यंदा अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी गणेशोत्सवानिमित्त अमेरिका आणि भारतासह जगभरातील गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्थिंक महासत्ता असलेल्या अमेरिकेत भारतीय लोकांचे प्रमाण लक्षणिय असल्याने येथील हिंदू मतांवर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा डोळा आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गणेशोत्सवानिमित्त विशेष ट्विट करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. जो बिडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत.

ट्विटमध्ये जो बिडेन म्हणाले की, अमेरिका आणि भारतासह संपूर्ण जगातील हिंदू लोक गणेश चतुर्थी साजरी करत आहे. तुम्ही सर्व अडथळे पार करू शकता आणि नव्या सुरुवातीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका