ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनविज्ञान/तंत्रज्ञान
Trending

अमावास्याही असते शुभ, आज ‘खप्पर’ योगाने होणार ‘छप्परफाड’ लाभ

वाचा थक्क करायला लावणारी बातमी

Spread the love

स्पेशल रिपोर्ट / डॉ. नाना हालंगडे
आज शुक्रवार रात्री 6 वाजून 17 मिनिटांनी ते उद्या शनिवार उत्तररात्री 2 वाजून 23 मिनिटापर्यंत दर्शा मौनी अमावस्या असणार आहे. पण येणारी प्रत्येक अमावस्या ही शुभच असते. हे कसे पाहा.

या मौनी अमावस्येला तब्बल 30 वर्षानंतर खप्पर योग येत आहे. यावेळी २१ जानेवारीला शनिवारी ही अमावस्या आली आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, १७ जानेवारीला शनि देवाने ३० वर्षानंतर कुंभ राशीत गोचर केले आहे. तर मकर राशीत शुक्र आणि शनीची युती होत आहे. यामुळे जो विशेष संयोग बनला आहे. तो खप्पर योग आहे. (Mauni Amavasya 2023)

प्राचीनकाळी अमावास्या ही शुभ मानली जात असे. सर्व देव अमावास्येच्या ठिकाणी निवास करतात, असे अथर्ववेदात म्हटले आहे. सध्या मात्र अनेकजण अमावास्या अशुभ मानतात.

आज आपण अमावास्येसंबंधी माहिती करून घेऊया.

वैशाख अमावास्येला भावुका अमावास्या म्हणतात. अमावास्या सोमवारी आल्यास तिला सोमवती अमावास्या म्हणतात. या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला १०८ वस्तू अर्पण करतात आषाढातील अमावास्या दिव्याची अमावास्या असते. या दिवशी दिव्यांची निगा राखून दीपपूजन केले जाते. श्रावणातील अमावास्येस पिठोरी अमावास्या म्हणतात. भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून मानली जाते. आश्विनातील अमावास्या लक्ष्मीपूजनाची अमावास्या ही मंगलदायक म्हणून मानली जाते. अमावास्येला नदीस्नान करण्याची प्रथाही प्राचीनकाळी होती. भारतात अनेक ठिकाणी अमावास्येच्या दिवशी सूर्यपूजा व व्रतवैकल्ये करण्याचीही प्रथा आहे.

शनिवारी आलेली मौनी अमावस्या आणि कुंभ राशीतील शनी गोचरमुळे ३० वर्षानंतर आलेला खप्पर योग हा शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम समजला गेला आहे. त्यामुळे या दिवशी शनि देवाची पूजा करून त्यांची विशेष कृपादृष्टी मिळवता येऊ शकते. या दिवशी शमीच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने कुटुंबावरील सर्व शनि दोष दूर होतात.

अमा म्हणजे सह, वस् म्हणजे राहणे सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या’ म्हणजे सूर्य चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या म्हणावं असे सांगण्यात आले आहे. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, अशी व्याख्याही प्राचीन एका ग्रंथामध्ये केली आहे. अमावास्येचा उल्लेख ऋग्वेदात नाही. परंतु सूर्यग्रहण हे अमावास्येलाच होते आणि सूर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. अथर्ववेदात अमावास्येसंबंधी एक सूक्त आढळते.

शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या अमावस्येचा खप्पर योग महत्त्‍वपूर्ण आहे. नदीतील पवित्र स्नानानंतर शनी देवाची आरती करून शनी देवाला मोहरीचे तेल वाहा. शनी चालीसेचा पाठ करून शनीला काळे तीळ अर्पण करा. आरती करताना काळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गरीबांना दानधर्म करावा. यामुळे शनी देवाची कृपा प्राप्त होऊन साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव कमी होण्‍यास होते.

अमावास्येला पृथ्वीच्या संदर्भात चंद्र व सूर्य एकाच रेषेत येतात. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुक्लपक्षात चंद्राचे सूर्यसापेक्ष कोनात्मक अंतर वाढत जाते. पौर्णिमेलाच ते १८० अंश होते. कृष्णपक्षात चंद्र व सूर्य यांमधील कोनात्मक अंतर कमी कमी होत जाते.

सध्या काही लोक अमावास्या ही अशुभ असते असे मानतात, परंतु प्राचीनकाळी अमावास्या ही शुभ मानली जात असे. अथर्ववेदातील सूक्तामध्ये अमावास्या म्हणते की, “समस्त देव माझ्याप्रत येऊन माझ्या ठायी निवास करतात. साध्यादी देव, तसेच इंद्रप्रमुख देवगण माझ्यासह राहत असल्यानेच मला अमावास्या हे नांव मिळाले.”

ज्या लोकांना शनिची साडेसाती, अडीचकी सुरू झाली आहे. ते वरील प्रकारे शनि देवाची पूजा करून साडेसातीतून मुक्ती मिळवू शकतात. मात्र, ज्यांना साडेसाती नाही त्यांनी या मौनी अमावस्येला शनि देवाची शास्त्रानुसार विशेष पूजा केल्यास शनिकृपेने त्यांना छप्परफाड लाभ मिळू शकतील. तसेच या दिवशी दानधर्म केल्याने अनेकांना मोठे लाभ प्राप्त होऊ शकतात.

अमावास्येची रात्र आम्हास धनदायी होवो असाही एका सूक्तामध्ये सांगितले आहे. रामायणकाली अमावास्या शुभ मानीत होते, असे उल्लेखही सापडतात. रावणाचा सुपार्श्व नावाचा बुद्धिमान अमात्य रावणाला म्हणाला.
आज कृष्णपक्षातील चतुर्दशी आहे. यासाठी तू आजच युद्धाच्या तयारीला लाग आणि सेनेला बरोबर घेऊन तू उद्या अमावास्येच्या मुहूर्तावर विजयासाठी बाहेर पडा.

महाभारतात मात्र काही ठिकाणी अमावास्या ही शुभ मानलेली आहे, तर काही ठिकाणी अशुभ मानलेली आहे. कृष्णाने कर्णाजवळ युद्धघोषणा करतांना म्हटले आहे._
_आजपासून सातव्या दिवशी अमावास्या आहे. इंद्र ही तिची देवता आहे. त्या दिवशी युद्धाला प्रारंभ होईल श्रीकृष्णाला यादवांच्या विनाशाची जी लक्षणे दिसत होती, त्यातच त्याने त्रयोदशीयुक्त अमावास्या हा एक योग सांगितला आहे. भारतीय युद्धाच्यावेळी असाच योग होता. हेही त्याने याच वेळी सांगितले आहे. महाभारतात एके ठिकाणी अमावास्येचा एक भयंकर मुहूर्त असा उल्लेख केलेला आहे.

अमावास्येचे दोन प्रकार आहेत. एक सिनीवाली आणि दुसरी कुहू, या पूर्वा अमावास्या. सा सिनीवाली । या उत्तरा सा कुहू: असे वचन आहे. म्हणजेच कृष्ण चतुर्दशी युक्त अमावास्येला सिनीवाली म्हणतात आणि शुक्ल प्रतिपदायुक्त अमावास्येला कुहू म्हणतात. असे अनेक प्राचीन ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे. दिनमानाचे पाच भाग करावे. पहिला भाग प्रात:काळ, दुसरा भाग संगवकाळ, तिसरा भाग मध्यान्हकाळ, चौथा भाग अपराण्हकाळ आणि पाचवा भाग सायंकाळ मानावा असे सांगण्यात आले आहे. अपराण्हकाळी अमावास्या असेल त्या दर्श अमावास्येस अमावास्या श्राद्ध करावे असे सांगण्यात आले आहे.

अमावास्या आणि मृत्यू
अमावास्येच्या दिवशी जास्त अपघात होतात, मृत्यूही जास्त होतात असाही एक गैरसमज आहे. एखादा पेशंट सिरियस असेल तर अमावास्या टळून जाऊदे, म्हणजे त्याच्या तब्बेतीत सुधारणा होईल असे आपण म्हणतो. त्यातही काही तथ्य नाही. मृत्यू आणि अमावास्या यांचा काहीही संबंध नाही.

(वैधानिक इशारा : आम्ही कोणत्याही काल्पनिक, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या माहितीचा पुरस्कार करीत नाही. वरील माहिती ही केवळ मनोरंजन म्हणून वाचावी. – संपादक)


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका