अन्नधान्याच्या दक्षता कमिट्या कागदोपत्री

सांगोला तालुक्यातील विदारक चित्र

Spread the love

सांगोला तालुक्यातील हजारो रेशन कार्डधारकांना आजही माल मिळत नाही. ऑनलाईनच्या नावाखाली हा सारा खेळ सुरू आहे. याची दखल सांगोल्यात पुरवठा विभाग घेत नाही. अनेक कार्डधारक कार्यालयात जातात,पण तेथे कोणीही योग्य माहिती देत नाहीत. तहसीलदारही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे हजारो कार्डधारक रेशनच्या मालापासून वंचित आहेत.

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अनागोंदी कारभार सुरू आहे. हजारो कार्डधारकांना रेशनचा मालही मिळत नाही. जो माल मिळतो त्यामध्येही ऑनलाईनच्या नावाखाली महाघोळ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरीब कुटुंबीयांना बसत आहे. तालुक्यातील दक्षता कमिट्या कागदोपत्रीच पहावयास मिळत आहेत.

रेशन ग्राहकांसाठी अतिमहत्‍वाचे
रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख, वेळेसहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्रामपंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

<script async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-4526426174540309″
crossorigin=”anonymous”></script>

आपण आपल्या गावात रेशन दुकानातून रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणून
महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp रेशन दुकानदारानी शासनाकडून किती माल घेतला हे खालील लिंकवर पहावे
https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.
http://mahafood.gov.in/pggrams/ वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds@gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेले आहे.

स्वस्त धान्य दुकानातील धान्य दर
गहू – २ रू. किलो तांदूळ- ३ रू. किलो साखर – २० रू . किलो तुरदाळ- ३५ रू. किलो उडीद दाळ – ४४ रू किलो. जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता.

चोरांना खुलेआम आपली लूट करन्याची संधी देवू नका. सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी. आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पोलीसात तक्रार करा.

सांगोला तालुक्यातील हजारो रेशन कार्डधारकांना आजही माल मिळत नाही. ऑनलाईनच्या नावाखाली हा सारा खेळ सुरू आहे. याची दखल सांगोल्यात पुरवठा विभाग घेत नाही. अनेक कार्डधारक कार्यालयात जातात,पण तेथे कोणीही योग्य माहिती देत नाहीत. तहसीलदारही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे हजारो कार्डधारक रेशनच्या मालापासून वंचित आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका