अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही ही देशासाठी शरमेची बाब : बापूसाहेब ठोकळे
सांगोला/प्रतिनिधी
मार्क्स, आंबेडकरवादी विचारांचे महान साहित्यिक, थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाची दखल घेऊन रशियाच्या राजधानीच्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभा करण्यात आला. मात्र भारतात कित्येक वर्षांपासून मागणी करूनही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही ही देशासाठी शरमेची बाब असल्याची खंत बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केली.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, भारत देशामध्ये अजूनही छुपी जातीय व्यवस्था प्रचंड प्रमाणात फोफावलेली आहे. हे त्रिकालबाधित वास्तव नाकारता येणार नाही. बहुजन समाजामधील समाज सुधारक असो किंवा बहुजन समाज बांधव असो यांच्याकडे काही समाजकंटकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे. ज्यावेळेस भारत देशातून समोर जातीय व्यवस्था याचे उच्चाटन होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने भारत प्रगतीपथावर जाईल.
बहुजन समाजातील महामानव यांचे महान कार्य इतर देशांना दिसून येते. परंतु भारतात मात्र ते दिसून येत नाही. मार्क्स, आंबेडकरवादी विचारांचे महान कवी थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाची दखल घेऊन रशियाच्या राजधानीच्या ठिकाणी त्यांचा पुतळा उभा करण्यात आला. त्याचप्रमाणे भारत सरकारने एकमताने निर्णय घेऊन त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी समस्त सर्व बहुजन बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.
थोर महामानवांनी समाज सुधारकांनी देशासाठी आपले बलिदान आयुष्यभर मोफत दिलेले आहे यांना सन्मानित करणे आवश्यक असते. समाजसुधारकांना कोणतीही जात नसती हे समाजकंटकांनी लक्षात घ्यावे व प्रत्येक जाती धर्मातील समाज सुधारक महापुरुषांना दैनंदिन जीवनामध्ये समान न्याय वागणूक द्यावी.
पाहा खास व्हिडिओ