ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

…अखेर सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या

जिल्ह्यातील 189 ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Spread the love

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुदत संपलेल्या सांगोला तालुक्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे गाव पुढाऱ्यांना आता जोमाने या निवडणूक प्रक्रियेत उतरावे लागणार आहे.

माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याने आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अक्कलकोट तालुक्यातील 20, बार्शी 22, करमाळा 30, माढा 8, माळशिरस 35, मंगळवेढा 18, मोहोळ 10, उत्तर सोलापूर 12, पंढरपूर 11, सांगोला 6 आणि दक्षिण सोलापूर 17 अशा एकूण 189 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत.

सांगोला तालुक्यातील अनकढाळ, बलवडी, चिंचोली, चिणके, पाचेगाव खु., शिवणे या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर.

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांकरिता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत.

कोणत्या गावांत निवडणूक

 

 

 

 

हेही पाहा

गद्दारांकडे आम्ही लक्ष देत नाही : अदित्य ठाकरेंचा शहाजीबापूंवर निशाणा

दीपकआबांच्या दणक्यानंतर सुस्त प्रशासन ताळ्यावर, उद्याच रस्ता होणार दुरुस्त

भिडे गुरुजी चिडले, “त्या मुलीवर कारवाई करा. अन्यथा..” मेहता पब्लिशिंगला दिला इशारा

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका