अक्कलकोटजवळ जीप अपघातात पाच ठार
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात अंदाजे पाचजण जागीच ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या MH13AX1237 या जीपचे पुढील टायर फुटल्याने ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात हलवले. अपघातग्रस्त हे स्वामी समर्थांचे दर्शन करून सोलापूरकडे येत असताना हा अपघात झाला आहे . कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर , अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे . हा अपघात परिसर आहे. या ठिकाणी आतापर्यंत पंधरा ते वीस मोटारसायकलचे अपघात झाले असून , हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र झालेला आहे.