अकोल्यात असंख्य सरपंचांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !

प्रस्थापित पक्षांना हादरा

Spread the love

अकोला – वंचित बहुजन आघाडीने सामान्य माणसाला न्याय मिळावा याकरिता घेतलेली भूमिका व लॉकडाउनमध्ये सर्वसामान्यांना दिलेला अाधार यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे अनेकांचा कल वाढला आहे. अकोल्यातील असंख्य सरपंचांनी वंचित बहुजन आघाडीत नुकताच प्रवेश केला आहे.

बारुल्यातील विशेषता कोळी समाजाचे सरपंच यांनी वंचित मध्ये प्रवेश केला.जिल्ह्यातील दहिहांडाचे सरपंच शांताराम दंदी, टाकळीचे गणेश अग्रवाल, चोहट्ट्याचे सरपंच दिलिप वडाळ, रेलचे सरपंच शंकरराव घुगरे, करतवाडीचे सुदर्शन किरडे, टाकळीचे उपसरपंच मंगेश ताडे, चोहट्ट्याचे उपसरपंच श्रीकृष्ण लांडे, दनोरी चे गणेश बुटे, व कावस्याचे निलेश बगाडे यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदिप वानखडे, कृषी सभापती पंजाबराव वढाळ यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, जि. प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सभापती सुशांत बोर्डे, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, सभापती आकाश शिरसाट, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई, दिपक गवई, दिनकरराव खंडारे, पराग गवई, संजय बावणे, हितेश जामनिक, राजकुमार दामोदर, आदेश खाडे, किशोर जामनिक, प्रा. शैलेश सोनोने, संजय पाटिल, प्रकाश प्रधान, जयराज चक्रनारायन, अनुकूल ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

यावेळी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले या प्रसंगी सरपंचांनी केवळ वंचित बहुजन आघाडीतच सन्मानाची वागणूक मिळत असल्याने आपण प्रवेश केल्याचे सांगितले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका