अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

Spread the love

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : 14 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषी विद्यापीठे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन संयुक्त सेवक कृती समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्टोंबर 2020 पर्यंत लेखणी व अवजार बंद आंदोलन पुकारण्यात आला होते. त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

मंत्रीमहोदयांनी दिलेल्या आश्वासनानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून त्याबद्दल  मंत्री महोदयाचे कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्वर सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रही विनंती करण्यात आली.

 

याप्रसंगी कृती समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील अध्यक्ष गजानन काशीद, महासंघ उपाध्यक्ष रविराज शिंदे, महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, सुनील थोरात, उपाध्यक्ष नितीन मुंडफने, श्रीमती रुपाली हुंडेकरी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आनंद

पवार, प्रशांत पुजारी फोरमचे अध्यक्ष प्रशांत चोरमले, सचिव जावेद खैरादी, मलिक रोकडे,  दिगंबर हराळे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष मलकारसिद्ध हैनाळकर, सचिव सचिन चौधरी, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष वसंतराज सपकाळे उपाध्यक्ष श्रीमती सीता नवगिरे व संघटनेचे सरचिटणीस रविकांत हुक्कीरे हे उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका