थिंक टँक स्पेशलराजकारण

पाटलाची औलाद हाय.. 175 खोकी इस्कटल्याती

आ. शहाजीबापूंनी सांगितलं इंगित

Spread the love

सांगोला तालुक्यात सुख , दुःखाच्या सर्व कार्यक्रमांना बापूंची उपस्थिती असते. अशा कार्यक्रमांतून ते लोकांशी संवाद साधतात. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयाचा बार उडवून द्यायचा असा चंग त्यांनी बांधला असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्यादृष्टीने ते सक्रिय झाले आहे. सांगोला तालुक्यात करोडो रुपयांचे रस्ते मंजूर झाल्याचे ते सांगत आहेत. प्रशासनावरील त्यांचा चांगला वचक दिसून येत आहे. मात्र, ते अधिकाऱ्यांना धमकावून आपल्या विरोधकांची सत्ता असलेल्या गावात विकास कामांना निधी मंजूर करू देत नसल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
“मी पाटलाची औलाद हाय.. खोकी घरात ठेवणाऱ्यातले आम्ही न्हाय.. नागजपास्न कोळेगावपर्यंत पत्रावळ्यासारखी 175 खोकी इस्कटल्याती.. इस्कटणारी कर्णाची औलाद हाय..” असा घणाघात करत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. (MLA Shahajibapu Patil Sangola)

“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील हे अलीकडील काळात प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” या डायलॉगने त्यांना अमाप प्रसिध्दी मिळवून दिली आहे. शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांना ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधक अनेक दिवसांपासून करत आहेत. या आरोपांना सर्व बंडखोर आमदार जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत. (Uddhav Thackeray, Ajet Pawar, Sanjay Raut)

सांगोला येथे आ. शहाजी बापू पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. पन्नास खोके एकदम ओके याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच आ. शहाजीबापू पाटील चांगलेच चिडले. (Pannas khoke.. ekdam ok)

आ. शहाजीबापू पाटील म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी उगीच पोकळ सभा घेऊन फिरू नये. निवडणूक जवळ येवू द्या. मी एकाच सभेत या त्यांना पुरून उरेल.”

“पन्नास खोके घेतल्याचा आरोप खा. राऊत करत आहेत. मला डाळिंब, द्राक्षे यांची खोकी माहीत आहेत. खोके घेणारा मी नाही. मी पाटलाची औलाद हाय.. खोकी घरात ठेवणाऱ्यातले आम्ही न्हाय.. नागजपास्न कोळेगावपर्यंत पत्रावळ्यासारखी 175 खोकी इस्कटल्याती.. इस्कटणारी कर्णाची औलाद मी हाय..”

“खोकी आली की आम्ही जवळ ठेवत नाही. ती वाटून टाकत असतो. अशी पाऊणे दोनशे खोकी मी पत्रावळ्या सारखी उधळली आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही नातवासाठी खोकी जपून ठेवा. ती नासून जातील.” असा घणाघात करत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचीही विकासकामात साथ मिळत असल्याने आ. शहाजीबापू पाटील यांना हत्तीचे बळ मिळाले आहे. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हेही महत्त्वाचे असणार आहे.

बापू प्रचंड सक्रिय
शेकापचे नेते भाई गणपतराव देशमुख यांच्याकडून अनेक पंचवार्षिक निवडणुका सतत हरल्यानंतर आ. शहाजी पाटील यांना २०१९ च्या निवडणुकीत निसटता विजय मिळाला. विजयी झाल्यापासून आ. शहाजी पाटील प्रचंड सक्रिय झाले आहेत.

सांगोला तालुक्यात सुख , दुःखाच्या सर्व कार्यक्रमांना बापूंची उपस्थिती असते. अशा कार्यक्रमांतून ते लोकांशी संवाद साधतात. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयाचा बार उडवून द्यायचा असा चंग त्यांनी बांधला असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्यादृष्टीने ते सक्रिय झाले आहे. सांगोला तालुक्यात करोडो रुपयांचे रस्ते मंजूर झाल्याचे ते सांगत आहेत. प्रशासनावरील त्यांचा चांगला वचक दिसून येत आहे. मात्र, ते अधिकाऱ्यांना धमकावून आपल्या विरोधकांची सत्ता असलेल्या गावात विकास कामांना निधी मंजूर करू देत नसल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत.

नुकतेच सांगोला येथे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आ. शहाजी पाटील उपस्थित होते. त्याच दिवशी शिंदे गटातील सर्व आमदारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले होते. मात्र, आपल्या मतदार संघात होत असलेल्या साहित्य संमेलनास उपस्थित राहणे आ. शहाजी पाटील यांनी पसंद केले. ते कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाराज असल्याचीही चर्चा झाली. मात्र, साहित्य संमेलन असल्याने मी गेलो नाही असे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

सांगोला येथे झालेल्या साहित्य संमेलनातही आ. पाटील केंद्रस्थानी होते. कवी संमेलनात त्यांच्या लोकप्रिय “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” या डायलॉगवर अनेकांनी कविता सादर केल्या.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचीही विकासकामात साथ मिळत असल्याने आ. शहाजीबापू पाटील यांना हत्तीचे बळ मिळाले आहे. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हेही महत्त्वाचे असणार आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका