गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
Trending

दिल के टुकडे 35, मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये, मुंडके पाहत “तो” झोपायचा

ही बातमी वाचून तुम्हालाही घाम फुटेल!

Spread the love

ही प्रेमकहानी मुंबईतून सुरू झाली. २६ वर्षीय श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. इथेच तिची पूनावालाशी भेट झाली. दोघांनी डेटिंग सुरू केलं आणि जास्त वेळ एकत्र घालवायला सुरुवात केली. त्यांचे नाते घरच्यांनी मान्य केले नाही, त्यामुळे ते कुटुंबीयांना न सांगता दिल्लीला गेले. इकडे मेहरौली परिसरात त्यांनी फ्लॅट घेऊन राहायला सुरुवात केली. काही काळ ठीक होते. पण नंतर लग्नावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं. आफताबने लग्न करावं अशी श्रद्धाची इच्छा होती पण तो तयार नव्हता.

नाना हालंगडे/थिंक टँक न्यूज नेटवर्क

प्रेमाच्या नात्याला कलंक लावणारी अत्यंत भयानक घटना दिल्लीत उघडकीस आलीय. महाराष्ट्रातील एका तरुण प्रियकराने प्रेयसीचा खून करून धारधार शस्त्राने ३५ तुकडे केले. हे सर्व तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. यातील दोन तुकडे तो दररोज जंगलात श्वापदांसाठी टाकायचा. फ्रीजमध्ये ठेवलेले प्रेयसीचे मुंडके पाहत तो फ्रिजजवळच झोपी जायचा…

(डोकं सुन्न करणारी ही घटना अक्षरबध्द करताना आमचे शब्दही थिजले आहेत. घटनाक्रम मांडताना थरकाप उडतोय.. हात थरथर कापतायेत. मात्र, घटनेतील भीषणता वाचकांना कळावी हाच यामागचा हेतू आहे.- संपादक)

आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा पालकर

सोशल मीडियातून जाळ्यात ओढले
फूड ब्लॉगर असलेल्या आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा पालकर यांची मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये ओळख झाली. मात्र हे दोघे विभिन्न धर्माचे असल्याने त्यांच्या लग्नाला विरोध झाला असावा. असे असले तरी 26 वर्षीय श्रद्धा वालकरने तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत आपले नाते सुरूच ठेवले. त्याच्या या वागण्यामुळे तीचे आई-वडिलांशी बोलणे होत नव्हते.

तोंडावरून अगदी साधा दिसणारा आफताब असं काही करेल यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्याचं पूर्ण नाव आफताब अमीन पूनावाला आहे. त्याने मृतदेहाचे एक नाही तर दिल्लीत अनेक ठिकाणी तुकडे केले होते. श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघरची रहिवासी होती. आफताबने पोलिसांना चकमा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. श्रद्धाच्या मृतदेहापर्यंत पोलीस कधीच पोहोचणार नाहीत आणि तिचे रहस्य कायमचे गुपित राहील याची त्याला खात्री होती.

अफताब आणि श्रद्धा हे दोघेही मुंबईहून दिल्लीला आले. दिल्लीत आल्यानंतरही श्रद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायची. यामुळे तिच्या घरच्यांना तिच्या संदर्भात माहिती मिळत होती. मात्र, 5 महिन्यांपासून मुलीसंदर्भात कसल्याही प्रकारचे अपडेट न मिळाल्याने तिचे कुटुंबीय अस्वस्थ झाले. श्रद्धाचा फोन गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. तेव्हा तिच्या वडिलांना काही तरी अघटित घडल्याचा संशय आला. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी थेट दिल्ली गाठली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

८ नोव्हेंबर रोजी तिचे वडील विकास मदन आपल्या मुलीची विचारपूस करण्यासाठी दिल्लीला पोहोचले. ते फ्लॅटवर गेले तेव्हा दरवाजा बंद होता. यामुळे त्यांनी तातडीने मेहरौली पोलिसात जाऊन अपहरणाची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला आणि अंगाचा थरकाप उडवणारे सत्य समोर आले.

लग्न कर म्हणताच संपविले
हे प्रेमीयुगुल दिल्लीत येऊन राहत होते. दोघांचं संसार सुखाचा सुरू होता. घरात पैसा-पाणी वेळच्या वेळी येत असल्याने हे जोडपं समाधानी होतं..

हे सर्व ठीकठाक सुरू असताना श्रद्धाने अफताबच्या पाठीमागे लग्न करण्याचा तगादा लावला. घरातून पळून जावून संसार सुरू असल्याने दोघांनाही पाठबळ नव्हते. लग्नाच्या विषयावरून त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

आफताबने लिव्ह इन पार्टनर श्रद्धाच्या लग्न करण्याच्या मागणीनंतर तिचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. त्या दिवशी त्याने मटण कापायच्या धारधार सुरीने श्रद्धाचा गळा आडवा चिरला. श्रद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडली. श्रद्धाचा मृतदेह लपविण्यासाठी त्याने 300 लिटरचा नवीन फ्रीज विकत आणला. फ्रीजमध्ये हा मृतदेह बसू शकत नव्हता. त्यामुळे त्याने चाकूने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. मुंडके वेगळे करून हे सर्व तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. तो रोज रात्री दोनच्या सुमारास तिच्या शरिराचे दोन तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकण्यासाठी जात असे. आपल्या प्रेयसीची आठवण काढत तो श्रद्धाचे मुंडके पाहत झोपी जायचा. तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर त्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून तो उदबत्याही लावत होता.

१८ मे रोजी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं तेव्हा आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ठेवण्यासाठी फ्रीज विकत घेतला. पुढील १८ दिवस आफताब मध्यरात्रीनंतर घरातून निघून श्रद्धाच्या शरीराचे अवयव दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत राहिला. त्याने सांगितलं की प्रत्येक २ किमी गेल्यानंतर तो मृतदेहांचे तुकडे जंगलात फेकायचा जेणेकरून ते प्राणी खाऊ शकतील.

अमेरिकन मालिका पाहून केले कृत्य
आफताबने या घृणास्पद घटनेचा कट एक अमेरिकन क्राईम शो ‘Dexter’ पाहून रचला होता. या शो मध्ये मर्डर, पुरावे नष्ट करावे हा आशय सिनेमॅटिक पद्धतीने दाखवला जातो. ही मालिका आफताब नेहमी पाहत होता हे त्याने दिलेल्या कबुली जबाबात सांगितले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडेही सापडले आहेत.

पोलिस अधिकारी सांगतात की,
आफताबने गेल्या एप्रिलमध्ये मुंबईत श्रद्धाच्या हत्येचा कट रचला होता. तो मुद्दाम श्रद्धासोबत हिमाचल प्रदेशला जायला निघाला, जेणेकरून त्यांच्यातील नातं गोड होईल. दोघेही जवळपास तीन आठवडे हिमाचल प्रदेशात राहिले. त्यानंतर ८ मे रोजी ते दिल्लीत आले. येथे दोन दिवसांपूर्वी दोघे पहाडगंज येथील हॉटेलमध्ये थांबले होते. पैसे संपल्यावर दोघेही साकेतमधील सैदुलजाब येथील पीजीमध्ये चार दिवस राहिले. त्यानंतर मित्राच्या मदतीने आफताबने छतरपूर येथे शेजारी जंगल असलेल्या ठिकाणी भाड्याने घर घेतले.

15 मे पासून दोघेही भाड्याच्या घरात राहू लागले. नऊ हजार रुपये भाड्याने घर घेतले होते. चार दिवसांनंतर 18 मे रोजी रात्री आफताबने श्रद्धाची झोपेत असताना गळा आवळून हत्या केली. जेणेकरून त्याला आवाज आणि विरोध करता येणार नाही. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी १९ मे रोजी आफताबने फ्रिज विकत घेतला आणि जवळच्या बाजारातून सूरा आणला. आफताबने करवतीने श्रद्धाच्या शरीराचे छोटे तुकडे केले, जेणेकरून ते फ्रीजमध्ये सहज ठेवता येईल. शेफच्या प्रशिक्षणादरम्यान कटिंगचे प्रशिक्षण घेतले होते.

पोलिस अधिकारी सांगतात की, आफताबनेही मुंबईतून पदवी घेतली आहे. तसेच, तीन वर्षांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये शेफची नोकरी केली होती. नोकरीवर असताना त्यांनी शेफचे दोन आठवडे प्रशिक्षण घेतले. ज्यामध्ये त्याला सांगण्यात आले होते की, जर त्याला संपूर्ण बकरा आणि कोंबडा दिला तर त्याचे छोटे तुकडे कसे करावेत, जेणेकरून ते फ्रीजमध्ये सहज ठेवता येईल. स्वच्छता आदींबाबत प्रशिक्षणही देण्यात आले. यातून आफताबला मृतदेहाचे छिन्नविछिन्न चांगलेच ठाऊक होते.

हे कसले प्रेम?
प्रेम म्हणजे दोन जीवांचे एकत्र येणे असते. या प्रकरणातील हे दोघे तरुण एकत्र आले मात्र त्याचा शेवट इतका भयानक झाला की ही घटना देशपातळीवर चर्चिली गेली. भयचकित करणाऱ्या या मर्डर मिस्ट्रीमुळे देश हादरला आहे.

हेही पाहा

अनिकेत आणि मी एकच, आबासाहेबांसोबत माझी तुलना करू नका

शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका