ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी

डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे दणदणीत स्वागत

Spread the love

सांगोला/नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे सांगोला येथे वाजत गाजत, विजयाचा जयजयकार करत स्वागत करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब देशमुख हे मागील काही दिवसांपासून डेंग्यू आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागली. दरम्यानच्या काळात डॉ. अनिकेत देशमुख यांनी गावभेट दौरा सुरू केल्याने बाबासाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. आगामी निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार कोण? बाबासाहेब की अनिकेत अशा चर्चा सोशल मीडियावर झडू लागल्या.

“बाबासाहेब देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कार्यकर्त्यांचे आभार मानले.  आज मी श्रीमंत झालो पुन्हा सर्वांच्या आशिर्वादाने जनसेवेत रूजू झालो , भरून पावलो , हीच खरी श्रीमंती ….. तब्ब्येतीविषयी विचारपूस करण्याकरिता राज्यातून सर्वांचेच फोन आले पण त्यात सांगोलेकरांनी फोन करून घेतलेली काळजी , माझ्या सांगोलेकरांचं माझ्यावरील निस्सीम प्रेम माझ्याबद्दल असणारी काळजी , तब्ब्येतीविषयी केलेली विचारपूस व बरे होण्यासाठी तुम्ही सांगोलेकरांनी व्यक्त केलेल्या सदिच्छा या खरंच माझ्यासाठी अनमोल आहेत … कोणतेही पद , पैसा नसतानाही या जनतेच्या उदंड प्रेमानेच आज मी श्रीमंत झालो , जनसेवेत रुजू झाले … हीच माझी श्रीमंती मला चांगले कार्य करण्यासाठी अधिक बळ देईल …. या काळजी बद्दल तब्ब्येतीबद्दल विचारपूस करून आजारपणातून बरे होण्याकरिता दिलेल्या सदीच्छांबद्दल आपले मनःपूर्वक आभार.” अशा शब्दांत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

दरम्यान, बाबासाहेब देशमुख हे आजारातून बरे झाल्याने ते रविवारी सांगोला येथे येणार असल्याचे घोषित करण्यात आले. ते येत आहेत म्हटल्यावर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली. ते सांगोला शहरात येईपर्यंत रस्त्यावरील अनेक गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आला.

शेकापचा नेता कोण? तालुक्यात प्रचंड संभ्रम

 

सांगोला शहरात सकाळी अकराच्या सुमारास बाबासाहेब देशमुख यांचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वाजत गाजत त्यांची मिरवणुक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी बाबासाहेब देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत घरापर्यंत वाजत गाजत आणले.

देशमुख बंगल्यावर येताच त्यांनी कार्यकत्यांनी अभिवादन केले. आपले प्रेम असेच कायम राहो अशी अपेक्षा व्यक्त होत. विविध गावांतून आलेल्या त्यांच्या समर्थकांनी त्यांचा सत्कार केला.

माध्यमांचा प्रपोगंडा!

 

दरम्यान, बाबासाहेब देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कार्यकर्त्यांचे आभार मानले.

आज मी श्रीमंत झालो
पुन्हा सर्वांच्या आशिर्वादाने जनसेवेत रूजू झालो , भरून पावलो , हीच खरी श्रीमंती ….. तब्ब्येतीविषयी विचारपूस करण्याकरिता राज्यातून सर्वांचेच फोन आले पण त्यात सांगोलेकरांनी फोन करून घेतलेली काळजी , माझ्या सांगोलेकरांचं माझ्यावरील निस्सीम प्रेम माझ्याबद्दल असणारी काळजी , तब्ब्येतीविषयी केलेली विचारपूस व बरे होण्यासाठी तुम्ही सांगोलेकरांनी व्यक्त केलेल्या सदिच्छा या खरंच माझ्यासाठी अनमोल आहेत … कोणतेही पद , पैसा नसतानाही या जनतेच्या उदंड प्रेमानेच आज मी श्रीमंत झालो , जनसेवेत रुजू झाले … हीच माझी श्रीमंती मला चांगले कार्य करण्यासाठी अधिक बळ देईल …. या काळजी बद्दल तब्ब्येतीबद्दल विचारपूस करून आजारपणातून बरे होण्याकरिता दिलेल्या सदीच्छांबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! येतोय भेटीला , तुमच्या सेवेला. – डॉ. बाबासाहेब देशमुख प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना

पाहा खास व्हिडिओ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका