सोलापूरसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर पडणार?

वाचा काय आहे कारण

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. यात सोलापूरसह मुंबई, ठाणे, नागपूर अशा मोठ्या महापालिकांचा समावेश आहे.

हे आहे कारण
राज्यातील 10 महापालिकांची मुदत फेब्रुवारी 2022 आणि 25 जिल्हा परिषदांची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. राज्य सरकारने राज्यातील महापालिकांच्या प्रभागांची आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्या वाढीसाठी राज्य सरकार 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या गटांची फेररचनेची प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी आणखी विलंब लागण्याची चिन्हं आहेत.

सदस्य संख्या वाढणार
सदस्य संख्या वाढणार असल्याने राज्यातील सर्व महापालिकेत प्रभागांची आणि जिल्हा परिषदेत गटांची फेररचना यामुळे करावी लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया पार पडायला उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत.

फेब्रुवारीमध्ये मुदत संपणार
फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या 10 महानगरपालिकांमध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या बड्या महापालिकांचा समावेश आहे.

मार्च 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 25 जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

आधीच राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, आणि कोल्हापूर या महानगरपालिकांची निवडणूक कोरोनामुळे प्रदीर्घ काळ रखडल्या आहेत. त्यात फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकाही पुढे जाण्याची चिन्हं आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका