गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

सांगोला शहराजवळ वेश्या व्यवसाय

पोलिसांनी केला टप्प्यात कार्यक्रम

Spread the love

रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यामधून गेलेल्या अनेक गावाच्या खुणा सध्या संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या महामार्गावर नवनवीन व्यवसाय सुरू झाले आहेत. वासना शमविण्यासाठी वेश्या व्यवसाय सुरू करून येथील लॉज मालकांनी धाडस केले आहे. ही किड या भागातून कायमची हटवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

थिंक टँक / नाना हालंगडे
दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला शहराजवळ वेश्या व्यवसाय चालतोय. ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. मात्र हे खरं आहे. सांगोला शहराजवळ असलेल्या लेंडवे चिंचाळे (ता. मंगळवेढा) परिसरामध्ये लाॅजवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैध वेश्याव्यवसाय करीत असलेल्या प्रकरणी पीडित महिला व बनावट ग्राहक, लाॅज मालकाला ताब्यात घेतले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.

रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील लेंडवे चिंचाळे परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यामधून गेलेल्या अनेक गावाच्या खुणा सध्या संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या महामार्गावर नवनवीन व्यवसाय सुरू झाले असतानाच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना खबऱ्यामार्फत याच महामार्गावर लेंडवे- चिंचाळे परिसरात हाॅटेल ज्ञानेश्वरी लाॅजीग & बोर्डीगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावेळी पथकाची नियुक्ती करून या परिसरामध्ये कारवाईसाठी पाचारण केले.

यावेळी उड्डाण फुलाच्या खाली बनावट ग्राहक पाठवून बाजूला थांबले व सदर बनावट ग्राहक व पीडित मुलगी जवळच असलेल्या ज्ञानेश्वरी लॉजमध्ये गेले. यावेळी टाकलेल्या धाडीत पीडित महिला, बनावट ग्राहक व ज्ञानेश्वरी लॉज चे मालक हे सापडले.

या प्रकरणी अधिक चौकशी केली असता हाॅटेल ज्ञानेश्वरी लॉजीग & बोर्डीगमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलेचे शारीरिक शोषण करून तिच्याकडून स्वतःच्या फायद्यासाठी आर्थिक कमाई केल्याप्रकरणी भादवि कलम 370 व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने हे करीत आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सहायक पोलिस फौजदार अविनाश पाटील पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, अशोक बाबर, पुरुषोत्तम धापटे, पोहे कॉन्स्टेबल हजरत पठाण, दत्तात्रय येलपले, राजू आवटे, प्रविण सावंत, अंजना आटपाडकर,सुनिता चवरे हे यांच्या पथकाने केली.

दररोज कार्यक्रम
रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यामधून गेलेल्या अनेक गावाच्या खुणा सध्या संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या महामार्गावर नवनवीन व्यवसाय सुरू झाले आहेत. वासना शमविण्यासाठी वेश्या व्यवसाय सुरू करून येथील लॉज मालकांनी धाडस केले आहे. ही किड या भागातून कायमची हटवावी अशी मागणी करण्यात येत आहे.


हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका