ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

सांगोला तालुक्यात चिंच उत्पादकांचा झालाय “आकडा”

दहा किलोच्या चुंगड्यालाही घेतला जातो "कडता"

Spread the love

चिंच विविध रूपाने निर्यात केली जाते.त्यामध्ये अखंड चिंच,फोडलेली चिंच, गाभा, गर, बियांची पावडर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. चिंचेला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचेचे फळ म्हणजे न उकरणारी शेंग, चिंचेचा आकडा, फुगीरपणामध्ये अकडलेला भाग पिकल्यावर तांबूस रंगाचा होतो.

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
चिंचेचा हंगाम सुरू झालेला आहे. पण याच चिंचेला सध्या कवडीचा भाव असल्याने उत्पादकांचे अक्षरश: कंबरडेच मोडले आहे. त्यांचा आकडा झालेला आहे. आज किलोला केवळ 10 रुपये इतकाच भाव मिळत असून,वरून काटा मारणारे हे व्यापारी 10 किलो काय 5 किलोच्या चुंगड्यालाही 1 किलो कडता घेत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. याबाबीकडे कृषी उत्पन् बाजार समिती, कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

चिंच हे सदाहरित वृक्ष असल्याने कोठेही लावल्यानंतर येतो. हेच झाड दीर्घायुषी वृक्ष आहे. शंभर वर्ष तर सहजच टिकते. आपल्या देशात तामिळनाडू राज्यात दोनशे वर्षापर्यंतची जुनी चिंचेची झाडे आहेत. सांगोला तालुक्यातही शेतकऱ्यांच्या बांधावर, उभ्या रानात 15 हेक्टराहून अधिक क्षेत्रावर ही चिंचेची झाडे आहेत. सध्या याच चिंचेचा हंगाम बऱ्यापैकी साधलेला आहे. पण उत्पादन चांगले असताना, याच चिंचेला दर नाही.

त्यामुळे अवघ्या 10 रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. त्यातही भरीला भर व्यापारी 5 किलोच्या चूंगड्यालाही 1 किलोचा कडता घेत आहेत. त्यातच त्याच दुकानदारांची काटामारी ही वेगळीच आहे. याबाबीकडे कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांची दलाली वाढलेली आहे.

चिंच हे झाड गर्द सावली देणारे झाड असून याच चिंचेच्या अकोला स्मृती, चिंच प्रतिष्ठान, नंबर 263,योगेश्वरी,जगदीश, उदीग्राम व धारवाड चिंच या जाती आहेत. L महाराष्ट्रात 14 हजार 500 हेक्टर क्षेत्रात चिंच आहे. त्यापासून ७०० टन उत्पादन मिळत आहे. एकूण निर्यात होणाऱ्या मसाल्याच्या पिकांपैकी चिंचेचा सहावा क्रमांक लागतो. हेच चिंच कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणूनही संबोधले जाते.

भारतातील चिंच विविध रूपाने, प्रामुख्याने कॅनडा, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स इत्यादी प्रगतशील देशांमध्ये पाठविली जाते. जवळपास 52 देशांमध्ये चिंच पाठविली जाते. हीच चिंच विविध रूपाने निर्यात केली जाते.त्यामध्ये अखंड चिंच,फोडलेली चिंच, गाभा, गर, बियांची पावडर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. चिंचेला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचेचे फळ म्हणजे न उकरणारी शेंग, चिंचेचा आकडा, फुगीरपणामध्ये अकडलेला भाग पिकल्यावर तांबूस रंगाचा होतो.

चिंच, गुळाची आमटी, चिंचेचा सार, चिंचेची चटणी, चिंचेच्या गराचे सरबत आदीसाठी वापर केला जातो. चिंचेचा पाला शेळ्यासाठी चारा म्हणून उपयुक्त ठरतो. दक्षिण भारतात आहारात चिंच दररोज वापरली जाते. प्रक्रिया उद्योगात आवळ्या इतकीच चिंच सुद्धा उपयुक्त आहे. पिकलेल्या चिंचा व त्यातील चिंचोके काढून चिंचेचा गर मीठ लावून, सुकवून कित्येक महिने साठवून ठेवला जातो. बार्शी येथे चिंचोका पीठ देशभर प्रसिद्ध असून, त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात ही होते.

चिंचेचा सॉस हा कोपरगावचे अंजली फूड प्रॉडक्ट मधून कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व गुजरातमध्ये पाठविला जातो. अहमदनगरचे चींचगर हा प्रक्रिया पदार्थ निर्यात होतो.

चिंचेच्या वाळलेल्या गरामध्ये 7.2 टक्के पोट्सिक बॉय टाटरिक,9.1 टक्के चिंच अम्ल आणि 2.2 टक्के लिंब आम्ल तसेच अल्प तसेच अल्प प्रमाणात मलिक आम्ल असते.अशी ही भवुबहुगुणी गुणी चिंच सध्या कवडीमोल भावाने विकत आहे. सांगोला तालुक्यात एक प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी विभाग लक्ष देत नसल्याने, अश्या या व्यापाऱ्यांचे फावले आहे.शेतीमालाच्या तसेच फळपिकांचे त्यांचे दर बळीराजाला मरणारेच आहेत.

सांगोल्यात 15 हेक्टर क्षेत्र
सांगोला तालुक्यात चिंचेचे क्षेत्र 15 हेक्टर इतके आहे. ही बांधावरची लागवड असली तरी अनेकांनी चांगल्या रानातही चिंच लागवड केली आहे. यामध्ये आंबट चिंचेबरोबर गोड चिंचेचाही समावेश आहे. पण सध्या याच चिंचेला कवडीमोल भाव आहे. त्यातच 10 किलोलाही कडता घेतला जात असल्याने, उत्पादकांचा आकडा झालेला आहे.

धान्याबरोबर फळालाही कडता
सांगोला तालुक्यातील जवळा येथील व्यापारी कडता घेण्यास अव्वलस्थानी आहेत. कोणत्याही मालाला दाखविण्याच्या अगोदरचा दर तर माल घेवून गेल्यानंतरचा दर जमीन अस्मानचा फरक आहे. अश्यातच चिंचेलाही हेच व्यापारी कडता घेवू लागले आहेत. याच चिंचेचा भाव अवघा 10 रुपये प्रतीकिलो इतका आहे. केवळ व्यापाऱ्यांच्या आडमुठ्यापणामुळे बळीराजाची अवस्था न पहावनारी अशीच आहे.

आंबट चिंच कडू गोडवा
आंबटगोड चिंच जेवणाला चव आणतेच. पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते.पण यंदा परतीच्या जोरदार पावसामुळे चिंचेच्या झाडांना मोठ्या प्रमाणात चिंचा लागल्या.पण याच चिंचेला भाव नसल्याने उत्पादकांना आंबट चिंचेचा कडू गोडवा पहावयास मिळत आहे. याच चिंचेला लातूर,उदगीर हैद्राबादसह इतर ठिकाणी मोठी मागणी असते,पण यावर्षी माल असूनही याला भाव नाही.


हेही वाचा

एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण

बाळशास्त्री जांभेकर : आद्य संपादक, समाजसुधारक आणि प्राध्यापक

शहाजीबापूंनी दणक्यात वजन घटवलं

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका