सांगोला आगारातून एसटी सेवा सुरू

32 दिवसानंतर लालपरी धावली; दोन गाड्या आगारातून बाहेर पडल्या

Spread the love

सांगोला / नाना हालंगडे
तब्बल 32 दिवसानंतर सांगोला आगारातून लालपरी धावली असून सोमवार 6 डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. सोलापूर व डिकसळमार्गे जत अशा दोन गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत.

राज्यभर एसटी कामगार विलीनीकरनासाठी संपावर गेले होते. अश्याच राज्य सरकारने पगारवाढ केल्याने संप मागे घ्या असे सांगितले. दरम्यान राज्यभर 45 कर्मचाऱ्यांनी जीवन यात्रा संपवली. त्यामुळे दुःखवठा म्हणून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पण राज्य सरकारने कामावर या असे आदेश दिले होते. तरीपण कामगार कामावर हजर राहत नसल्याने सांगोला आगारातील 25 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे,तर 5 जणांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आगारात 330 कर्मचारी असून,30 जनावर कारवाई करण्यात आली आहे. आत्ता 290 कर्मचारी आहेत.

या सर्वांच्या ड्युटी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सोमवार 6 डिसेंबरपासून सांगोला आगारातून एस टी सेवा सुरू करण्यात आलेली आहे. सोलापूरसाठी सकाळी 10 वाजता मंगळवेढामार्गे पहिली बस धावली. ही गाडी एम एच 14, बी टी 3727 तर जतला सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी डिकसळ मार्गे एम एच 14, बीटी 0317 ह्या दोन गाड्या गेलेल्या आहेत.

तब्बल 34 दिवस सेवा बंद असल्याने सांगोला आगाराला 1 कोटी 36 लाख रुपयाला फटका बसलेला आहे. आगारात 55 गाड्या असून चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या 330 इतकी आहे. आजपासून एसटी सेवा सुरू केली असली तरी,अनेक कर्मचारी कामावर आले म्हवते. आत्ता आज पासून या एसटी सेवेला सुरुवात झाली असून,शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सांगोला आगारातून आज सोमवार 6 डिसेंबरपासून एसटीची सुरू करण्यात आलेली आहे. सोलापूरला मंगळवेढामार्गे तर जतला डिकसळ गाडी सुरू करण्यात आलेली आहे. 32 दिवसाच्या बंदमुळे आगाराला 1 कोटी 36 लाखाच्या उत्पन्नाला फटका बसलेला आहे. उद्यापासून बऱ्याच मार्गावर एसटी सुरू करण्यात येणार आहे. – पांडुरंग शिकारे (आगार व्यवस्थापक, सांगोला)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका