ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी

रोहयोतून फळबाग लागवडीचा मार्ग मोकळा

Spread the love

रविवार विशेष/ नाना हालंगडे
कृषी विभागाने यंदा २०२२-२३ वर्षभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) योजनेतून फळबाग लागवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्याने निश्चित केलेल्या २५६ रुपये प्रतिदिन मजुरीनुसार सुधारित मापदंडानुसार सुधारित खर्चाच्या अंदाजपत्रकाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अप्पर मुख्य सचिवांनी मंजुरी दिली आहे. मात्र या वेळी रासायनिक खताचा खर्च वगळला आहे.

यंदा शेतात अमृत महोत्सवानिमित्त फळबाग लागवड करण्याचे सरकार आवाहन करत असले तरी रोहयोतील अन्य कामाच्या तुलनेत फळबाग लागवडीत सुधारित मापदंडातही शेतकऱ्यांना पैसे कमीच मिळणार असल्याचे दिसतेय. रोहयो तून राज्यात तीन वर्षांपासून फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढले. गेल्या वर्षी राज्यात ४२ हजार हेक्टरवर लागवड झाली. यंदा ६० हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. मात्र रोहयोच्या मजुरीत वाढ झाली.

सुधारित मापदंडानुसार सुधारित खर्चाच्या अंदाजपत्रकाला वरिष्ठ पातळीवर मंजुरी नसल्याने फळबाग लागवड ठप्प होती. या बाबत ॲग्रोवनने सातत्याने वृत्त प्रकाशित केल्यानंतर रोहयोचे अप्पर मुख्य सचीव नंदकुमार यांनी सुधारित मापदंडानुसारच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

पूर्वी २४८ रुपये दर होता आता तो २५६ रुपये झाला आहे. त्यामुळे नव्या दरानुसार मॉडेल अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी त्यात अनेक बाबी अडचणीच्या आहेत. कृषी विभागाने दरवेळीप्रमाणे रासायनिक खताचा खर्च प्रस्तावात दिला होता. रोहयो विभागाने तो वगळून मापदंड निश्चित केले आहेत.

तीन वर्षांत मिळणारे एकूण सामग्रीसह अनुदान (हेक्टरी)

आंबा (रोपे) : १,७८, ७६९, (कलमे ) : २३३९७३,
काजू (कलमे) : १४७६६०,
चिकू कलमे १९३२०७,
पेरू (कलमे ) : १६४०६४, (रोपे) : २६९९३२,
डाळिंब (कलमे) : २६६७१२,
संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे १, ९२, २२४,
नारळ रोपे (बाणावली व टी. डी.) १,७१, ४२३ व १,७५,०२३,
बोर रोपे १,३५,८४३, १,४४,८२४ व १,१३, ०७५,
सीताफळ (रोपे) : १,५७,४२९, (कलमे ) : १,६९, ४२९,
कागदी लिंबू (रोपे) : १,८२, २०७,
चिंचकलमे (विकसित) : १,२९,०३२,
चिंच, कवठ, जांभुळ रोपे १,३०,३३२,
जांभुळ कलमे १,३५,७३२,
कोकम रोपे : १,१४,१७७, कलमे १,१७,७७७,
फणस रोपे १,०७,१९० कलमे १,१०,९९०
अंजीर कलमे १,६५,८७०,
सुपारी : २,०९,९५३,
शेवगा : १,०४,१४२,
बांबू : १,१२,३६०,
साग १,२४,४५०,
औषधी वनस्पती ७७,०८८,
पानपिंपरी : ९५, ३१६,
शिंदी १,०९, ४३४,
जट्रोपा रोपे : ८६,०६१,
गीरीपुष्प ९५,८७२,
कडुनिंब : ७७,७७८,
हदगा : ९९२१४,
कढीपत्ता : ७२, २९६,
ड्रॅगनफ्रूट : २,२८७३१
अव्हॅकेडो : १,६५,२९९,

केळी : २,५६,३९५,
द्राक्ष : २,७७,८६४

*कुशल, अकुशलचा असमतोल
रोहयोतून केल्या जाणाऱ्या कामांत साधारणपणे मजुरीवर खर्च करण्यासाठी अकुशलमधून ६० टक्के व तर यंत्राने वा अन्य बाबीसाठी कुशलमधून ४० टक्के, असा समतोल आहे. मात्र नव्या मापदंडानुसार कुशल, अकुशलचा समतोल कमी-जास्त आहे. अकुशलमधून मजुरीसाठी तर कुशलमध्ये सामग्रीसाठी पैसे दिले जातात.

रासायनिक खताचा खर्च सामग्रीत येतो, तो वगळला आहे. त्यामुळे कुशलचे टक्केवारीतील प्रमाण कमी केल्याने त्याचे पैसे कमी मिळतील. त्याचा परिणाम फळबाग लागवडीवर होईल. रोहयोमधून केल्या जाणाऱ्या कामांत ६० : ४० चे प्रमाण असताना फळबाग लागवडीबाबतच असे प्रमाण का, असा प्रश्न आहे.

पाहा खास व्हिडिओ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका