माझी वसुंधरा आता बहरणार!

शेख गुरुजी दोन गावात लावणार 3500 वडांची झाडे

Spread the love

दापोली विद्यापीठातून 3500 वडाची झाडे उपलब्ध करून दोन्ही गावातील इयत्ता पहिली ते बारावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य संख्येएवढी वडाची झाडे संवर्धनाची जबाबदारी दिली जाणार आहे. चांगले झाड संवर्धन करणाऱ्या  20 विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्यावतीने पाचशे रुपये शालेय साहित्य घेण्यास बक्षीस दिले जाणार.

सांगोला / नाना हालंगडे
कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांगोला तालुक्यातील खुशालद्दीन शेख या प्राथमिक शिक्षकाची सातत्याने धडपड सुरू होती. लाखो रुपयाच्या स्वखर्चातून त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिले होते. आता याच खुशालद्दीन शेख या प्राथमिक शिक्षकाने  पुरस्काराच्या रुपाने मिळालेल्या 71 हजार रुपयांच्या रकमेतून एक नागरिक एक झाड या संकल्पनेतून साडेतीन हजार वडाची रोपे लावण्याचा संकल्प केला आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. तर ऑक्‍सिजनच्या अभावामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या कोरोना काळातही सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळीवस्ती (तरंगेवाडी) शाळेतील शिक्षक खुशालद्दीन शेख यांनी स्वखर्चातून डिजिटल जंगल क्लासरूम उपक्रम राबविला आणि कोरोना काळात विद्यार्थ्यांना अखंड शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांच्या कोरोना काळातील शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सोलापूर येथील छाया-प्रकाश फाउंडेशन यांच्याकडून त्यांना 50 हजार रुपये बक्षीस व सन्मानपत्र नुकतेच देण्यात आले होते.

सांगोला येथील अजळकर हॉस्पिटल यांच्याकडून दहा हजार रुपये बक्षीस व सन्मानपत्र, अहमदनगरच्या मंथन पब्लिकेशनकडून  11 हजार रुपये मिळाले होते. पुरस्काराची 71 हजार रुपये ही रक्कम त्यांनी तरंगेवाडी व जन्मगाव असलेल्या सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे येथे प्रत्येक नागरिकाच्या नावे त्याच्या स्वतःच्या जागेत 3500 वडाची झाडे लावण्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगितले आहे.

तंत्रस्नेही शिक्षक खुषालद्दिन शेख यांच्यावर जंगल क्लासरूम या उपक्रमामुळे अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सीईओ स्वामी यांनी कौतुक केले. यानंतर यांना सोलापूर येथील प्रकाश – छाया फाउंडेशनकडून 50 हजार रुपये, सांगोल्यात डॉ.अजळकर यांच्याकडून 10 हजार रुपये व मंथन प्रकशनाकडून 11 हजार रुपये असे 71 हजार रुपये बक्षीस मिळाले होते. त्यांनी हीच रक्कम वसुंधरेसाठी वापरली आहे.

ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
तरंगेवाडी व वाणीचिंचाळे येथील ग्रामस्थांच्यावतीने शिक्षक खुशालदिन शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खुशालद्दीन शेख यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सर्वाधिक ऑक्सिजन देणारी वडाची झाडे लावण्यासाठी पुरस्काराची 71 हजार रुपये रक्कम खर्च करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमास तरंगेवाडीचे सरपंच शरद खताळ, माजी सरपंच सुरेश गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष तळे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी खांडेकर, तानाजी कोळेकर, मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी, रामहरी लवटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत शिंत्रे यांनी केले तर आभार  श्रीमंत गावडे यांनी मानले.

एक नागरिक, एक झाड उपक्रम
दापोली विद्यापीठातून 3500 वडाची झाडे उपलब्ध करून दोन्ही गावातील इयत्ता पहिली ते बारावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य संख्येएवढी वडाची झाडे संवर्धनाची जबाबदारी दिली जाणार आहे. चांगले झाड संवर्धन करणाऱ्या  20 विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्यावतीने पाचशे रुपये शालेय साहित्य घेण्यास बक्षीस दिले जाणार.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका