ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

महूद-सांगोला रस्त्यावर मरणयातना

२५५ कोटी मंजूर, टेंडर मात्र ओपन होईना

Spread the love

मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आणि दुरुस्तीच्या नावाखाली मागील काळात जी दुरुस्ती केली ती दुरुस्ती म्हणजे जनतेच्या नुसते तोंडाला पाने पुसण्याचे काम या विभागाने केलेले आहे. सर्वसामान्य जनतेला आता दुरुस्तीच्या नावाखाली खुश करण्याचे काम हा विभाग करताना दिसत आहे.

थिंक टँक / नाना हालंगडे
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांचे गाव असलेल्या महुद ते सांगोला या रस्त्याची कैफियत अजूनही संपली नाही. आ. शहाजीबापू यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी २५५ कोटींचा निधी मिळाला खरा. मात्र, टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची तारीख ओलांडली तरीही टेंडर काही ओपन झाले नाही. वाहन चालकांसोबतच हा रस्ताही मरणयातना सहन करत आहे. प्रशासन मात्र डोळ्यांत धूळफेक करताना दिसत आहे.

(Advt)

सांगोला – महूद हा रस्ता सांगोला आणि माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. महूद हे गाव लोकसंख्येने मोठे आहे. शिवाय या गावाची बाजारपेठ मोठी आर्थिक उलाढाल करणारी असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते. परजिल्ह्यातून, परराज्यातून येणारी शेकडो वाहने या रस्त्यावरून ये – जा करत असतात.

शिवाय “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांचे गाव असल्याने या रस्त्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. महूद ते सांगोला असा एकूण २४ किमीचा हा रस्ता आहे.

(Advt.)

महूद ते सांगोला रोडच्या बाबत 7 फेब्रुवारी 2023 रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे एक महत्त्वाची बैठक झाली होती. या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे महूद ते सांगोला रोडची मेजर दुरुस्ती करण्याचे काम गेली दोन दिवस चालू झालेले आहे. परंतु त्या दुरुस्तीच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांच्याकडून नवीन मंजूर कामाच्या टेंडरची प्रक्रिया मुद्दामहून लांबविली जात आहे की काय? असा सवाल विचारण्यात येत आहे.

दुरुस्ती गरजेची आहेच. मात्र नवीन कामाचे टेंडर ओपन करा अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी तेथे चक्काजाम, रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुरुस्ती ही केलीच पाहिजे. कारण दुरुस्तीचे पैसे आलेलेच आहेत. त्यातून ही दुरुस्ती चालू आहे व नवीन कामाचे टेंडर निघालेले आहे. त्यावरह पाठपुरावा चालूच आहे. लवकरच टेंडर ओपन करण्यास भाग पाडू हे जनतेने लक्षात घ्यावे. – पत्रकार पवन बाजारे, महूद

मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आणि दुरुस्तीच्या नावाखाली मागील काळात जी दुरुस्ती केली ती दुरुस्ती म्हणजे जनतेच्या नुसते तोंडाला पाने पुसण्याचे काम या विभागाने केलेले आहे. सर्वसामान्य जनतेला आता दुरुस्तीच्या नावाखाली खुश करण्याचे काम हा विभाग करताना दिसत आहे.

नवीन कामाची मंजुरी असताना टेंडर ओपनिंग तारीख होऊन गेली असून सुद्धा, टेंडरची प्रक्रिया विनाकारण कोणत्या तरी कारणाखाली लांबवली जात असल्याचे दिसून येत आहे. जुनी डागडुजी करण्याऐवजी नवीन कामाच्या टेंडर वरतीच तातडीने काम करावे. होणाऱ्या मरणयातना थांबवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

दुरुस्ती कुचकामी
या रस्त्यावरून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे जनतेला त्रास हा चालूच आहे. तसेच येथे केलेली दुरुस्ती सुद्धा या जड वाहतुकीमुळे फार काळ टिकत नाही. दुरुस्ती गरजेची आहेच. मात्र नवीन कामाचे टेंडर ओपन करा अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी तेथे चक्काजाम, रस्ता रोकोच्या आंदोलन करण्यात आले.

दुरुस्ती ही केलीच पाहिजे कारण दुरुस्तीचे पैसे आलेलेच आहेत. त्यातून ही दुरुस्ती चालू आहे व नवीन कामाचे टेंडर निघालेलेच आहे त्यावरही आपला पाठपुरावा चालूच आहे व लवकरच टेंडर ओपन करण्यास भाग पाडू हे जनतेने लक्षात घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका