महामानवाचे महापरिनिर्वाण

कु. दीक्षा समाधान धांडोरे हिचा अभ्यासपूर्ण लेख

Spread the love

आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळेच त्यांना ‘बोधिसत्व’ म्हटले जाते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. त्यांच्या स्मारकास अभिवादन करतात.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. “काय वर्णन करू या प्रज्ञावंताचे आकाशाचा कागद करून समुद्राची शाई केली तरी अपुरे पडेल” एवढे वर्णन आहे माझ्या बाबाचे. त्यांनी दलित, बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी समर्थन केले.

ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी मिळवलीm ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. वृत्तपत्रे सुरू केली. त्यातून त्यांनी सामजिक, राजकिय प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचे आधुनिक काळात मोलाचे योगदान ठरले. त्यांच्या मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान हा किताब दिला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लड यासारखे मोठ्या देशात साजरा केला जातो.

2012 मध्ये त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या नावाने सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे बालपण फार हलाखीचे गेले. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर महू येथे झाला. 3 वर्षानंतर 1894 ला वडील रामजी मोलाजी सपकाळ निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थानांतरित झाले.

भीमराव आंबेडकर आपल्या आई-वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळ्यांचे लाडके होते. रामजी सपकाळ यांनी आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणाऱ्या विशेष अधिकाराचा फायदा झाला. परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातिगत भेदभावला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या जातीच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याचीही परवानगी नव्हती. या सर्व अन्याय यांना सहन करत देखील बाबासाहेब उच्च विद्याविभूषित झाले.

बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले. त्यानंतर मुंबईत एल्फिन्स्टन हायस्कूलला प्रवेश घेतला. अशा पद्धतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. 1907 ला त्यांनी मॅट्रिकची डिग्री मिळवली. इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला.

तरीही त्यांनी सगळ्यात कठीण परिस्थितीवर मात करत उच्चशिक्षण प्राप्त केले. आणि जगा समोर स्वतःला सिद्ध करून दाखवले. ते लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई रामजी सपकाळ असे होते. नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले त्यानंतर काही आठवड्यात 20 नोव्हेंबर 1956 मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिष्ट च्या चौथ्या परिषदेला ते हजर राहिले.

तिथे त्यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्सपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्यात न्याय बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. त्यांनी भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. 5 डिसेंबर सायंकाळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 12:15 वा महापरिनिर्वाण झाले.

शाळेत असताना मी खूप जिद्दी होतो, असे बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती. भिमाईची इच्छा होती की त्यांच्या मुलांना खूप शिकवायची इच्छा पूर्ण करत असताना जर जवळ पैसे नसतील तर आपल्या थोरल्या मुलीकडून दागिना उसना घेत, तो मारवाड्याकडे गहाण टाकून पैसे घेत व पुस्तक घरी येत असे.

बाबासाहेबांना अभ्यास करायला जागा मिळत नव्हती. त्यामुळे रात्री अभ्यास करायचा बेत सुरु झाला. बाबासाहेब पहाटे पाच वाजता उठून अभ्यास करत.

म्हणूनच म्हणावेसे वाटते…
जो झटला समाजासाठी आयुष्यभर…!!
स्वतःची पर्वा न करता अभ्यास केला दिवस आणि रात्रभर…!!
आणि दलितांना आणले समानतेवर…!!
त्यांचेच नाव भारतरत्न ,विश्वरत्न, बोधिसत्व ,महामानव परम पूज्य
डॉ.बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर…!!

त्यांनी समाजाला ठणकावून सांगितले बाबांनो “शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा” मुक्या प्राण्यांच्या दिवसा ढवळ्या कत्तली होतात रे म्हणून वाघासारखे जगायला शिका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली व कोटी कोटी प्रणाम!!!

कु. दीक्षा समाधान धांडोरे
इयत्ता : नववी
विकास विद्यालय, अजनाळे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका