भाईंच्या देवराईत जलशुद्धीकरण प्लांट मंजूर

जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांची माहिती

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील भाईंच्या देवराईमध्ये जिल्हा परिषद 15 व्या वित्त आयोगामधून दीड लाखाचा जलशुद्धीकरण प्लांट व कोळा गटातील अन्य गावासाठी 10 लाख रूपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती ॲड. देशमुख यांनी दिली.

सांगोला तालुक्यातील कोळा जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य देशमुख यांनी विकासाची गंगोत्रीच राबविली असून आत्ताही 10 लाखाहून अधिक रूपयाची कामे यांनी आणलेली आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेत ते एक अभ्यासू,विकसनशील असे नेतृत्व आहे. जिल्हा नियोजन समितीवरही ते काम करीत असून,मागील 3 महिन्यापूर्वी 15 वित्त आयोगाकडून त्यांनी ही कामे सुचविली होती.

या सूचविलेल्या सर्व प्रशासकीय कामांना आत्ता मंजुरीही मिळालेली आहे. ॲड. देशमुख यांनी सूचविलेल्या 11 विविध कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये विशेषतः डिकसळ येथे तालुक्याचे भाग्यविधाते स्व.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ साकारण्यात आलेल्या भव्यदिव्य देवराई प्रकल्पात दीड लाख रूपयाचा जलशुद्धीकरण प्लांट मंजूर केलेला आहे. ही देवराई ही 10 ऑगस्ट 2021 रोजी साकारण्यात आलेली असून ,अवघ्या पाच महिण्यातच यातील 118 प्रकारची विविध जातीची झाडे,डौलू लागली आहेत.

यामध्ये देवराई,फळबाग व घनवन आधी प्रकारची झाडे आहे. हे सर्व लोकवर्गणीतून साकारण्यात आले असून,सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाने भव्य अशी स्वागत कमान,अनेकांनी रंगीत बाकडे,विविध प्रकारची खते,कपाटे,टेबल यासह अनेक भेटवस्तू दिलेल्या आहेत. याच देवराईच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ॲड. देशमुख यांनी आपण भरीव मदत देणार असल्याचे घोषित केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी 15 वित्त आयोगातून आपल्या अधिकारातून दीड लाख रूपयाचा पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्लांट मंजूर करून घेतला आहे. याला मान्यताही मिळाली असून,येत्या आठ दिवसांत हा प्रकल्प देवराईत उभारण्यात येणार आहे.

याच बरोबर कोळा गटातील कोंबडवाडी येथील सिद्धनाथ मंदिर परिसरात ही आर ओ प्लांट ,यासाठी 2 लाख रूपये व अन्य ठिकाणी विकासकामांना मंजूरी आणलेली आहे.

अभ्यासू, कर्तत्वान जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी देवराई प्रकल्पासाठी जलशुद्धीकरण प्लांट दिलेला आहे. त्यामुळे येथील सर्वांना चांगल्या प्रकारचे पाणी तर प्यावयास मिळणार आहेच,पण येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वर्गांही याची उत्तम सोई होणार आहे. हा प्लांट येत्या आठ दिवसांत उभारण्यात येणार आहे. – तुकाराम भुसनर, डिकसळ

स्वर्गीय आबासाहेबांच्या स्मरणार्थ डिकसळ येथे साकारण्यात आलेला देवराई प्रकल्प हा राज्यामध्ये आदर्शवत असा आहे. मी स्वतः वारंवार भेट देत अडीअडचणी जाणून घेत आहे. आत्ता येथील तार कंपौउंडचा प्रश्नही मी स्वतः मार्गी लावणार आहे. आज ॲड. सचिन देशमुख यांनी जलशुद्धीकरण प्लांट देवून, चांगल्या प्रकारच्या पिण्याच्या पाण्याची सोई केलेली आहे. – डॉ. बाबासाहेब देशमुख, राज्य अध्यक्ष,पुरोगामी युवक संघटना

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका