ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

फळबाग योजना पुन्हा सुरू

भाऊसाहेब फुंडकर योजना तीन वर्षे होती बंद

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
राज्यात कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यंदासाठी सुरू करण्यात आली आहे. दहा दिवसांपूर्वी योजना सुरू करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. फळबाग लागवडी करिता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी १०४ कोटी पन्नास लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबवली जात आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) योजनेत पात्र असलेल्या व जॉब कार्डधारक पाच एकरांच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते.

मात्र जॉबकार्ड नसलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना फळबाग , लागवडीसाठी अनुदान मिळावे यासाठी राज्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून ही योजना सुरू करण्यात आली.

*जिल्हानिहाय आर्थिक लक्ष्यांक :
ठाणे :* ९४ लाख ३४,०००
पालघर :* १ कोटी ०७ लाख ७४,०००
रायगड :* २ कोटी १२ लाख ४४,०००
रत्नागिरी :* ३ कोटी २९ लाख ९६,०००
सिंधुदुर्ग :* १ कोटी ९० लाख
नाशिक :* ५ कोटी ६ लाख ३२,०००
धुळे :* १ कोटी ९९ लाख ५६,०००
नंदुरबार :* १ कोटी ३३ लाख ७०,०००
जळगाव :* ३ कोटी ६१ लाख ४४,०००
नगर :* ७ कोटी १ लाख ५१,०००
पुणे :* ५ कोटी ५२ लाख
सोलापूर :* ५ कोटी ८७ लाख ७२,०००
सातारा :* ४ कोटी ९२ लाख ४९,०००
सांगली :* ३ कोटी ६३ लाख ६७,०००
कोल्हापुर :* ३ कोटी ५४ लाख ०७,०००
औरंगाबाद :* ३ कोटी ९१ लाख ०५,०००
जालना :* ३ कोटी २६ लाख ४९,०००
बीड :* ४ कोटी ८६ लाख
लातुर :* ३ कोटी ७ लाख ७९,०००
उस्मानाबाद :* ३ कोटी १० लाख ७२,०००
नांदेड :* ४ कोटी ३५ लाख ३३,०००
परभणी :* २ कोटी ७९ लाख ५५,०००
हिंगोली :* १ कोटी ७८ लाख ४८,०००
बुलडाणा :* ३ कोटी ४७ लाख २७,०००
अकोला :* २ कोटी २ लाख ९५,०००
वाशीम : १ कोटी ७७ लाख ३८,०००
अमरावती :* ३ कोटी ५४ लाख ६७,०००
यवतमाळ :* ३ कोटी ७८ लाख ३६,०००
वर्धा :* १ कोटी ८८ लाख, ९४,०००
नागपूर :* २ कोटी ४६ लाख ६९,०००
भंडारा :* १ कोटी ३८ लाख ४५,०००
गोंदिया :* १ कोटी ४२ लाख, ९७,०००_
चंद्रपूर :* २ कोटी ५६ लाख ६९,०००_
गडचिरोली :* १ कोटी १३लाख

*योजनेच्या सर्वसाधारण अटी : कोकण विभागात किमान १० गुंठ्यांपासून ते १० हेक्टरपर्यंत तर अन्य विभागांत २० गुंठ्यांपासून ६ हेक्टरपर्यंत फळबाग लागवड करता येणार आहे.
कमाल क्षेत्र मर्यादेत एकापेक्षा अधिक फळपिके लावता येणार
मनरेगामधील लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ घेता येणार नाही.
यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
महाडीबीटीवर अर्ज करावा, लक्ष्यांकापेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत काढणार
१६ प्रकारच्या बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका