ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

प्रकाश आंबेडकर यांचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली बैठक

Spread the love

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लाखो मते खेचले होती. वंचित बहुजन आघाडीच्या 20 हून अधिक उमेदवारांना दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची भरघोस मते मिळाली आहेत. त्यामुळे साहजिकच वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला.

थिंक टँक / नाना हालंगडे
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका घेतली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर हे शिंदे गटासोबत युती करून आगामी निवडणुका लढवणार का? अशीही चर्चा होत होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी जो पक्ष भाजपसोबत आहे त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीला घेऊन कधीही जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

Will Prakash Ambedkar join forces with the Shinde group and contest the upcoming elections? Such a discussion was also taking place. However, Prakash Ambedkar has made it clear that the party which is with the BJP will never take the Vanchit Bahujan Aghadi with them.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. राज्यात आता नवीन समीकरण तर समोर येणार नाही ना? अशी चर्चा सुरू झाली. मात्र या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगितली. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, जे भाजपसोबत आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाण्याचा विषय येत नाही. महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी काही हालचाल होतेय का? याकडे देखील लक्ष असल्याचं म्हटलं आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते भेटून गेले. मात्र ठाकरे गटाकडून अद्याप राजकीय चर्चा नाही, असंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मविआमधील काही घटकांची माझ्याशी चर्चा झाली. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस एकटे लढणार आहे. त्यामुळं मविआ म्हणून एकत्र बोलणार आहात की वंचित बहुजन आघाडीशी प्रत्येक घटक वेगवेगळी चर्चा करणार आहात, हे त्यांनी स्पष्ट करावं. अजूनपर्यंत महाविकास आघाडीतील घटकांकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar said that some elements of Mavia were discussed with me. Nana Patole said that Congress is going to fight alone. Therefore, they should make it clear whether they are going to talk together as Maviya or whether they are going to discuss each component separately with the Vanchit Bahujan Aghadis. Prakash Ambedkar also said that there has been no response from the constituents of Mahavikas Aghadi yet.

मुख्यमंत्री का भेटले?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे 20 नोव्हेंबरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याचे चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे आता ही नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आता महाविकास आघाडी राहणार की ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र वंचित बहुजन आघाडीला आपल्या बाजूने घेण्यासाठी तर आज मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली नाही ना? असा संशय या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मात्र मी केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. ठाकरे आणि वंचित कार्यक्रमाचा याच्याशी काही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीतील सध्या तरी काँग्रेस स्वबळाची भाषा करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं म्हणलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की शिंदे गट वंचित बहुजन आघाडीला आपलंस करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेसोबत की स्वतंत्र?
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लाखो मते खेचले होती. वंचित बहुजन आघाडीच्या 20 हून अधिक उमेदवारांना दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची भरघोस मते मिळाली आहेत. त्यामुळे साहजिकच वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीवेळी असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबत होता. मात्र ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये दुही निर्माण झाल्याने विधानसभेला एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे स्वतंत्रपणे लढले.

मागील निवडणुकीत युतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची झालेली अवहेलना पाहता असंख्य कार्यकर्ते हे प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करून ही निवडणूक लढवावी असाही सूर निघताना दिसत आहे. असे असले तरी प्रकाश आंबेडकर ऐनवेळी नेमकी कोणती भूमिका घेतात हेही पाहावे लागणार आहे. काही असो येत्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत युती करून जोरदार लढत देतील हे मात्र निश्चित आहे.

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला इतका मोठा माहोल तयार झाला नसला तरी वंचित बहुजन आघाडीने इतर पक्षांना चांगलीच लढत दिली. आता येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एका कार्यक्रमानिमित्ताने एकाच मंचावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवणार का? अशी चर्चा सुरू आहे. सध्याच्या विस्कटलेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला सहानुभूती मिळताना दिसत आहे.

मागील निवडणुकीत युतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची झालेली अवहेलना पाहता असंख्य कार्यकर्ते हे प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करून ही निवडणूक लढवावी असाही सूर निघताना दिसत आहे. असे असले तरी प्रकाश आंबेडकर ऐनवेळी नेमकी कोणती भूमिका घेतात हेही पाहावे लागणार आहे. काही असो येत्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत युती करून जोरदार लढत देतील हे मात्र निश्चित आहे.

सोलापूर राष्ट्रवादीत भूकंप, दिग्गज नेत्याचा आज शिंदे गटात प्रवेश

भिडे गुरुजींचं ट्विट.. “..तर श्रद्धा आज “टिकली” असती”

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका