आरोग्यगुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनमाध्यमविश्वराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची केंद्र सरकारच्या माध्यम शब्दकोश निर्मितीवर निवड

Spread the love

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील मास कम्युनिकेशन विभागाच्या जडणघडणीत डॉ. रवींद्र चिंचोलकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी या विभागात रुजू झाल्यापासून माध्यम शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

थिंक टँक न्यूज नेटवर्क
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे त्रैभाषिक माध्यम शब्दकोश निर्मिती करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्यासाठी निवडलेल्या समितीवर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड करण्यात आली आहे.

यासंदर्भात डॉ. चिंचोलकर यांना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे पत्र प्राप्त झाले आहे. इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांमध्ये माध्यम शब्दकोश तयार करण्याचे कार्य भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेले आहे. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी या समितीची बैठक दिनांक 5 ते 9 सप्टेंबर 2022 दरम्यान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मान्यवर भाषा तज्ञांचा सहभाग असणार आहे.

या निवडीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्याची देशस्तरावर नोंद घेतली जात असल्याचे मत डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्र कुलसचिव डॉ. सुरेश पवार, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांनी डॉ. चिंचोलकर यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी लोकमतसह महाराष्ट्रातील विविध नामांकित वृत्तपत्रांत विविध पदांवर काम केले आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध कमिटीवर त्यांनी काम केले आहे. “जनसंपर्काचे अंतरंग” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे त्यांनी लेखन केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे मास कम्युनिकेशन विभागाच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी या विभागात रुजू झाल्यापासून माध्यम शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या विभागात अत्याधुनिक टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओ उभारण्यात आला आहे. विभागाकडून वेळोवेळी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात येतात. त्याद्वारे असंख्य विद्यार्थी विविध माध्यमांत पत्रकारिता करत आहेत. ते पीएच.डी.चे मार्गदर्शक आहेत. अनेक संशोधक विद्यार्थ्यानी डॉ. चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादित केली आहे. माध्यमांचे गाढे अभ्यासक अशी त्यांची ख्याती आहे.

हेही वाचा 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका