ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

विनोदी कथापर्वाची अखेर

Spread the love

पुणे – मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला होता. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृध्दापकाळानं त्यांच निधन झालं आहे.
त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.

द. मा. मिरासदार यांचा सत्कार करताना पद्माकर कुलकर्णी

मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.

प्रा . द . मा . मिरासदार हे सर्वांमध्ये ‘ दादासाहेब ‘ म्हणून ओळखले जायचे . त्यांचा जन्म सोलापूर जिल्हयातील अकलूज या गावी 14 एप्रिल 1927 साली झाला . त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर , महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे स . प . महाविद्यालयात झाले . त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली . काही काळ ते ना . सी . फडके संपादित साप्ताहिक ‘ झंकार’मध्ये लेखन करत होते . 1952 नंतर मात्र त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले . संभाजीनगरमध्ये देवगिरी महाविद्यालय येथे आणि पुढे गरवारे महाविद्यालय , पुणे येथे ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून निवृत्त झाले .

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका