ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

ग्रामपंचायत निवडणूकीत आई आणि मुलगा रिंगणात

सांगोला तालुक्यातील शिवणेत चुरस

Spread the love

स्थापनेपासून सन १९५८ ते २००७ पर्यंत ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. सन २००७ मध्ये सत्तांतर होऊन आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या गटाचे २०१७ पर्यंत दोन वेळा वर्चस्व राहिले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून शेकापकडे सरपंचपद गेले. तर बहुमत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते.

सांगोला/ नाना हालंगडे
सत्तेसाठी राजकारण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नसतो. नात्या नात्यातच थेट लढती झाल्याचे आपण पाहिले असेलच. आजोबा – नातू, बाप – मुलगा, भाऊ – भाऊ अशा लढती झाल्याचे पुढे आले होते. सांगोला तालुक्यातील शिवणे गावात मात्र यापेक्षा वेगळी लढत पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आई आणि मुलगा रिंगणात उतरले आहेत.

ग्रामपंचायतीच्या ५० वर्षांच्या राजकीय शिवणे गावाच्या घडामोडीत यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व शेकापकडून सरपंचपदासाठी अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले. परंतु केवळ सदस्य पदाच्या एका जागेवर तडजोड न झाल्यामुळे दोन्हीही पाठ्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे.

सरपंचपदासाठी ग्रामविकास आघाडीकडून मुक्ताई उद्योग समूहाचे उद्योगपती दादासाहेब घाडगे, तर शेकापच्या शेतकरी विकास आघाडीकडून खासगी पशुवैद्यक मारुती घोगरे यांच्यात दुरंगी लढत होत आहे.

दरम्यान, दोन्ही आघाड्यांकडून गाव, वाडी-वस्ती ‘होम टू होम’ मतदारांच्या भेटीगाठी घेऊन हायजॅक प्रचार सुरू असला, तरी गावातील वातावरण अत्यंत शांततेचे असल्याचे दिसून आले.

शिवणे ग्रामपंचायतीच्या मुलगा अन् आईही रिंगणात
शिवणे ग्रामपंचायतीत मुलगा दादासाहेब जनार्दन घाडगे हे सरपंचपदासाठी तर त्यांची आई माजी सरपंच कुसुमताई जनार्दन घाडगे हे सदस्य पदासाठी निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे आई व मुलाच्या लढतीकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

स्थापनेपासून सन १९५८ ते २००७ पर्यंत ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. सन २००७ मध्ये सत्तांतर होऊन आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या गटाचे २०१७ पर्यंत दोन वेळा वर्चस्व राहिले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून शेकापकडे सरपंचपद गेले. तर बहुमत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते.

त्यामुळे सरपंच शेकापचा, तर उपसरपंच आघाडीकडे होते. दरम्यान सरपंच पदासाठी राष्ट्रवादी, शिवसेना ग्रामविकास आघाडीकडून उद्योगपती दादासाहेब घाडगे तर शेकापक्षाकडून मारुती घोगरे दोघेजण निवडणूक लढवीत आहेत. सरपंच पदासह सदस्य पदाच्या ११ जागेसाठी निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार आहे.

हिवाळ्यात पाऊस का पडतो?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका