कसा बनतो प्राणवायू?

Think Tank Live Special Report

Spread the love

कोरोनाच्या दुस-या लाटेत कधी नव्हे ती अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आणीबाणीसदृश्य चित्र निर्माण झाले आहे. हा ऑक्सिजन नेमका कसा बनतो? पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण नेमके किती असते? मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय? यासारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित राहत आहेत. यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट.

Team Think Tank Live

• हवेत असतो फक्त २१ टक्के ऑक्सिजन
ऑक्सीजन चा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावला. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. विज्ञानात त्याची त्याची रासायनिक संज्ञा ओ (O) आणि अणू क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्राणु , ८ विजाणू आणि ८ न्यूट्रॉन असतात. हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. याच्या एका रेणूमध्ये २ अणू असतात. त्यामुळे त्याचे रासायनिक सूत्र O2 असे लिहितात. ऑक्सिजन चॉकोजेन ग्रुपचा सदस्य आहे. वस्तुमानानुसार, ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हेलियमनंतर विश्वातील तिसरे सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. पाण्यात प्राणवायु हायड्रोजन बरोबर ८:१ या प्रमाणात असतो.

• जीवंत राहण्यासाठी अत्यावश्यक घटक
जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक कामी येतो. सजीव प्राणी अन्न-पाण्यावाचून बराच काळ जीवंत राहू शकतो. मात्र ऑक्सिजनविना जीवंत राहणे शक्य नाही. ऑक्सिजनची सर्व सजिवांच्या श्वसनप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश उर्जा वापरली जाते. ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हा रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो.

• मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने अत्यावश्यक औषधांच्या यादीत, आवश्यक वैद्यकीय सामुग्रीत ऑक्सिजनचा समावेश केला आहे. ऑक्सिजनविना वैद्यकिय क्षेत्र अपुरे आहे. असे असले तरी हवेत उपलब्ध असलेल्या २१ टक्के ऑक्सिजनचा वापर थेट वैद्यकीय उपचारांमध्ये करता येत नाही. त्यासाठी मेडिकल ऑक्सिजनची गरज असते. मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती द्रवरूपात शास्त्रीय पद्धतीने मोठमोठ्या प्लान्टमधून केली जाते. मेडिकल ऑक्सिजन हा ९८ टक्क्यांपर्यंत शुद्ध असतो. मेडिकल ऑक्सिजनमध्ये बाष्प, धूळ किंवा इतर वायू नसतात. हे सर्व घटक मेडिकल ऑक्सिजन तयार करताना दूर केले जातात.

 

• हवेवर प्रक्रिया करुन बनतो मेडिकल ऑक्सिजन
सर्वसाधारण हवेद्वारेच मेडिकल लिक्विड ऑक्सिजन बनविण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी एअर सेप्रेशनच्या तंत्र वापरले जाते. हवेवर दाब देऊन नंतर ती फिल्टर केली जाते. हवेतील अशुद्ध घटक वेगळे केले जातात. ही फिल्टर केलेली हवा थंड केली जाते. ही वरवरची मांडणी झाली. हे सर्व होताना हवेवर विविध प्रक्रिया केल्या जातात. सुरुवातीला वातावरणातील शुद्ध ऑक्सिजन हा वेगळा केला जातो. ऑक्सिजनचा बॉयलिंग पॉईंट – १८३.०० डिग्री सेल्सियस एवढा आहे. हवा खूप थंड करून त्यातून ऑक्सिजन वेगळा केला जातो. हा ऑक्सिजन द्रवरूपात गोळा केला जातो. यामधून ९९.५ टक्के शुद्ध लिक्विड ऑक्सिजन मिळतो. त्यानंतर ऑक्सिजनला कॉम्प्रेस करून गॅसमध्ये परिवर्तित केले जाते. रिफिलिंग स्टेशनला पुरवून सिलेंडरमध्ये जमा केले जाते. हा ऑक्सिजन गॅस मोठ्या आणि लहान कॅप्सुलसारख्या टँकरमध्ये भरून रुग्णालयांपर्यंत पोहोचवला जातो. एका ऑक्सिजन सिलेंडरला भरण्यासाठी ३ मिनिटांचा अवधी लागतो. मात्र इथे एकावेळी पॅनेल बनवून २० पेक्षा अधिक सिलेंडर भरता येतात.

• तुळशीपासून मिळतो सर्वाधिक ऑक्सिजन
प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या तुळशीचे झाड प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचे आहे. घरालगत तुळस लावल्याने घरातील हवा शुद्ध राहते. प्रदूषणाचा स्तर साधारण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात तुळस मदत करते. यासाठी घरात जरूर तुळशीचे झाड लावायला हवे. यासोबतच तुळशीचे सेवन करणेही चांगले असते. यासाठी तुळशीचे पाणी पिणे फायदेशीर असते.

(सदर्भ : वीकिपीडिया, मुद्रित माध्यम)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका