अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा

सोनखेड येथील दाम्पत्यास महापुजेचा मान

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा सोमवार १५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते. यानंतर चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली.

यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ औसेकर महाराज, नगराध्यक्षा साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मंदिर समितीचे अधिकारी गजानन गुरव आदी सह महसूल, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस दलातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यांना महापूजेचा मान
यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका