नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी समाधान धांडोरे
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
सांगोला : थिंक टँक न्यूज नेटवर्क
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी समाधान धांडोरे यांची निवड करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संविधानाचा जागर आणि सांगोला तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील काम केलेल्या ज्येष्ठ नेतृत्वाचा आणि क्रियाशील नेतृत्वाचा सन्मान सोहळा सांगोला येथे संपन्न झाला. त्यावेळी या निवडी करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगम धांडोरे (सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद) हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून एनडीएमजे राज्य सचिव वैभव गीते, कायदेशीर सल्लागार अॅड. बापूसाहेब शीलवंत, अॅड. अमोल सोनवणे, डी. के. कांबळे, धनाजी शिव पालक (एनडीएमजे जिल्हा उपाध्यक्ष),
सांगोला नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर बनसोडे, दीपक बनसोडे,
बाळासाहेब बनसोडे, विनोद रणदिवे, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते गोपाळ लांडगे, राजू गुळीग (वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष), दलित मित्र साबळे गुरुजी, पंकजकुमार काटे (जिल्हाध्यक्ष एनडीएमजे) आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुख येताळा खरबडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी एनडीएमजेच्या तालुका कार्यकारणीच्या निवडी संपन्न झाल्या. तालुका अध्यक्षपदी समाधान धांडोरे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गडहिरे, तालुका सचिव महेश वाघमारे,
तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन धांडोरे, तालुका कार्याध्यक्षपदी प्रशांत चंदनशिवे, तालुका समन्वयक लकी उर्फ सुनील कांबळे, तालुका संघटक किरण सावंत यांच्या निवडी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल्या.