सांगोला तालुक्यातील वाढेगावात त्रिवेणी संगम पर्यटन केंद्र साकारण्यात येत आहे. वाढेगाव हे सोलापूर – सांगली महामार्गावर असल्याने येथे पर्यटन केंद्र सुरू होणार असल्याने त्याचा गावाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला शहर आणि तालुक्याला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जगासमोर यावा यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
सांगोला तालुक्यातील वाढेगावात त्रिवेणी संगम पर्यटन केंद्र साकारण्यात येत आहे. वाढेगाव हे सोलापूर – सांगली महामार्गावर असल्याने येथे पर्यटन केंद्र सुरू होणार असल्याने त्याचा गावाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
या प्रकल्पाची काही वैशिष्ट्ये
- एकूण २.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
- शासनाच्या पर्यटन विभागाकडून निधी
- मंदिराच्या कट्ट्या भोवती घाट बांधणे
- दगडी पिचींग करणे
- या परिसराचे सुशोभीकरण करणे
- येथे बैठक व्यवस्था तयार करणे
- बालकांसाठी खेळणी उपलब्ध करणे
- बेटाचा आकार वाढवणे