
सांगोला : विशेष प्रतिनिधी
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणे , संविधानाचा अपमान करणे ही लज्जास्पद गोष्ट असून या घटनेचा निषेध म्हणून आणि त्यातील मुख्य / सह आरोपीस, सूत्रधारास तत्काळ अटक करावी आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोदभैय्या उबाळे, महासचिव स्वप्निल सावंत, गोपाळ लांडगे सर , सचिव दीपक होवाळ ,सहसचिव सचिन उबाळे, तालुका उपाध्यक्ष लकी कांबळे, पोपट तोरणे, तालुका संघटक समाधान होवाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख वैभव काटे, तालुका सोशल मीडिया प्रमुख भीम मागाडे, नितीन गोडसे, चंद्रकांत मोरे, शुभम होवाळ , अतिश सावंत, सुमित शिंदे, किरण वाघमारे, समीर मोरे, सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विनोद उबाळे म्हणाले की, संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणे , संविधानाचा अपमान करणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. त्यातील मुख्य / सह आरोपीस, सूत्रधारास तत्काळ अटक करावी आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करावी.