सांगोला : डॉ. नाना हालंगडे
सांगोला विधानसभा मतदारसंघात रविवार, 10 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेच्या कार्यालयाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
रविवार, 10 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे हे 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते कोल्हापूर येथे अंबामातेचे दर्शन घेऊन करणार आहेत. मंगळवार, 5 रोजी ते कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेतील. त्याच दिवशी ते राधानगरी मतदारसंघ, रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा घेतील.
बुधवार, 6 रोजी ते भिवंडी येथील उमेदवारासाठी महाविकास आघाडीकडून आयोजित सभेत सहभागी होतील.
गुरुवार, 7 रोजी ते दर्यापूर, तिवसा, बडनेरा, बाळापूर येथील उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.
शुक्रवार, 8 रोजी बुलढाणा, मेहकर, परतूर येथे सभा घेणार आहेत.
शनिवार, 9 रोजी ते हिंगोली, परभणी येथे सभा घेतील.
रविवारी सांगोला येथे सभा
सांगोला मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारासाठी रविवार, 10 रोजी दुपारी तीन वाजता सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता ते सोलापूर दक्षिण येथील सभेसाठी जातील.
सांगोला येथे जय्यत तयारी
सांगोला येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.