ताजे अपडेट
Trending

डिकसळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना!

टिबीबाधित वृद्ध रूग्णाकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

Spread the love

माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार सांगोला तालुक्यातील डिकसळ गावात घडलाय. एका टिबीबाधित वृद्ध महिलेच्या उपचाराकडे आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधींच्या राजकीय वचननाम्यात “आरोग्यविषयक सुविधांची हमी” देण्यात आली होती. मात्र, आरोग्य विभागाकडून या वचननाम्यालाच केराची टोपली दाखवण्यात येत आहे. या वृद्ध महिलेच्या उपचारास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

सांगोला / नाना हालंगडे
स्वातंत्र्याचा आणि प्रजासत्ताकाचा सूर्य अजूनही ग्रामीण भागात उगवलेला नाही. खेडूतांना आरोग्याच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. असाच एक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार सांगोला तालुक्यातील डिकसळ गावात घडलाय. एका टिबीबाधित वृद्ध महिलेच्या उपचाराकडे आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधींच्या राजकीय वचननाम्यात “आरोग्यविषयक सुविधांची हमी” देण्यात आली होती. मात्र, आरोग्य विभागाकडून या वचननाम्यालाच केराची टोपली दाखवण्यात येत आहे. या वृद्ध महिलेच्या उपचारास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डिकसळच्या कलाआजीला टीबीच्या दुसऱ्या टप्प्याची लागण झाली. पण घरात कर्तेधर्ते कोणीच नसल्याने याच आजीच्या वयोवृध्द बापूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सांगोला तालुक्यात आरोग्य सेवाही कुचकामी ठरित आहे. याचा प्रत्यय गोरगरिब जनतेला येत आहे. याच कला आजीची करुण कहाणी अशी की, पोटी दोन पोरं अन् तीन लेकी. पण जी ती आपापल्या संसारात रमलेली. त्यामुळे कलाआजी अन् आण्णाना आरोग्य सेवेसाठी वणवण भटकावे लागत आहे. आजीचेही वय झालेलं. त्यात टीबीच्या दुसऱ्या स्टेजची लागण. याच आजीनं मागील १५ दिवसापासून तर अंथरून धरलं आहे. त्यात गावात खाजगी दवाखाना नाही अन् गावातील सरकारी दवाखान्यात यांना उपचार करण्यास मुभा नाय. त्यामुळं याच आजीच मरण अगदी स्वस्त झालंय.

सांगोला तालुक्यातील प्रशासकीय आरोग्य यंत्रणा मृत अवस्थेत आहे. आजही ग्रामीण भागातील आरोग्यवर्धीनी केंद्रातून तालुक्यातील जनतेला योग्य प्रकारची सेवा मिळत नाही. त्यात उपकेंद्रात असलेले समुदाय आरोग्य अधिकारीही त्याच चालीचे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील ४० आरोग्य उपकेंद्रे ही नावालाच पहावयास मिळत आहेत.

विशेष मोहीम खड्ड्यात!
शासन टीबी रुग्णासाठी विशेष अशी मोहीम राबवून, त्यांना घरपोच सेवा देत असते. याबाबत घेरडी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा रुग्ण माहीत आहे. पण हेच काम अंगाला कोणी लावून घ्यायचे? म्हणून याच कला आजीला आता मरणाशिवाय पर्याय नाही. त्यात विशेष म्हणजे तालुक्यातील अकोला येथील आरोग्यवर्धीनी केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे,असे समजते. पण त्यांना तिथेपर्यंत नेण्यास कोणी तयार नाही.

याच जीवनाच्या मरणासन्न अवस्थेबरोबर या वृद्ध आजीच्या घरात विजेचा प्रकाश नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ही डिकसळ गावातील हे भुसनर कुटुंबीय अंधारात चाचपडत आहे.

लोकप्रतिनिधींचे आरोग्याचे व्हिजन कुठाय?
उच्च विद्याविभूषित तसेच पेशाने डॉक्टर असलेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपल्या व्हिजनमध्ये आरोग्याचा विषय प्राधान्याने घेतला होता. पण आजही तालुक्यातील गोरगरिब जनतेला हीच सेवा मिळत नाही. त्यात टीबी रुग्ण म्हणजे त्या आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या प्रमुखाची जबाबदारी असते. त्यात दिमतीला आरोग्य सेवक, सेविका यांचा भरणा असतो. तरीही डिकसळ येथील कला आजीला कोणीच उपचार देईना झालेत.

डिकसळ येथील भूसनर कुटुंबीय अक्षरश: खूपच गरीब आहेत. त्यात खाजगी सोडा सरकारी दवाखान्यात जायचे म्हटले तरीही त्यांची एपत नाही. त्यामुळे यामुळे या कला आजी घरात खितपत पडल्या आहेत. त्यात टीबीच्या दुसऱ्या लागण झाल्याने त्यांची तब्येत खालावत चालली आहे. आजी तापाने बेजार आहेत. अन्नाचा कणही खात नाहीत.

टीबी घेतात हलक्यात
टीबी हा दुर्गम असा आजार आहे. शासन यासाठी लाखो रुपये खर्च करते. पण सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणावी तशी जनजागृती केली जात नाही. याच डिकसळ येथील कलाबाई बापू भूसनर (वय ६५) यांना टीबीच्या दुसऱ्या स्टेपने पछाडले आहे. त्यामुळे गावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील कोणीच कर्मचारी यांच्याकडे उपचारासाठी धजावत नाहीत. त्यांना कोणी सल्लेही देत नाहीत. याच बाबीकडे डॉक्टर असलेल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

डिकसळ येथील भूसनर कुटुंबीय अक्षरश: खूपच गरीब आहेत. त्यात खाजगी सोडा सरकारी दवाखान्यात जायचे म्हटले तरीही त्यांची एपत नाही. त्यामुळे यामुळे या कला आजी घरात खितपत पडल्या आहेत. त्यात टीबीच्या दुसऱ्या लागण झाल्याने त्यांची तब्येत खालावत चालली आहे. आजी तापाने बेजार आहेत. अन्नाचा कणही खात नाहीत.

क्षयरोग (टीबी) नेमका आजार काय आहे?
क्षयरोग (टीबी) हा Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मुख्यतः तो फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या इतर भागांवरही होऊ शकतो.

टीबीची लक्षणे:
1. खोकला: तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला.
2. खोकताना रक्त: कधी कधी खोकताना रक्त येऊ शकते.
3. थकवा: कायम थकवा जाणवणे.
4. वजन कमी होणे: अनैसर्गिकरित्या वजन कमी होणे.
5. ताप: विशेषतः संध्याकाळी सौम्य ताप येतो.
6. घाम येणे: रात्रभर खूप घाम येणे.

टीबीचा उपचार:
1. डॉक्टरांचा सल्ला: टीबीचे निदान झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. औषधोपचार: टीबीसाठी 6-9 महिन्यांचा नियमित औषधोपचार असतो (DOTS थेरपी).
3. पथ्य पाळणे: डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या. एकही डोस चुकवू नका, अन्यथा प्रतिकारशक्ती विकसित होऊन औषध परिणाम करणार नाही.
4. पोषण आहार: प्रथिनयुक्त आणि पोषणयुक्त आहार (दूध, अंडी, डाळी, फळे) घ्या.
5. इतरांपासून संरक्षण: संसर्ग टाळण्यासाठी खोकताना तोंड झाकणे व घरात चांगली हवा ठेवणे महत्त्वाचे आहे.

  • टीबीची प्रतिबंधात्मक उपाययोजना:
  • लसीकरण: बीसीजी लस टीबीपासून बचाव करते.
  • योग्य आहार व जीवनशैली: प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार आणि तणावमुक्त जीवनशैली महत्त्वाची आहे.
  • संसर्ग टाळणे: टीबी झालेल्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे.
  • टीबी पूर्णतः बरा होऊ शकतो, परंतु उपचारांमध्ये सातत्य हवे. काही प्रश्न असल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा.(Source : ChatGPT)

सांगोला तालुक्यातील अग्रगण्य “सांगोला पॉलिटिक्स” हे युट्यूब चॅनल नक्की पहा आणि सबस्क्राईब करा 

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका