ताजे अपडेट

डिकसळच्या पठ्ठ्याचा राज्यात बोलबाला

सूर्यफूल उत्पादन राज्यात अव्वल

Spread the love

सोपान करांडे यांनी Advanta कंपनीचे बी वापरले होते. सोपान करांडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना अवघी चार एकर इतकी शेतजमीन आहे. सतत शेतीत नवनवीन प्रयोग करून ते शेती कसतात. करांडे हे डिकसळ आश्रमशाळेत शिपाई पदावर काम करतात.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
डिकसळ ता.सांगोला येथील अल्प भुधारक शेतकरी सोपान करांडे यांनी शेतीत चमत्कार घडवून गावाचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग सन २०२२ खरीप हंगाम पीक स्पर्धेत सूर्यफुल या तेलबिया पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.

त्यांनी एक हेक्टरमधे ३२क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन काढले आहे.

सोपान करांडे यांनी Advanta कंपनीचे बी वापरले होते. सोपान करांडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना अवघी चार एकर इतकी शेतजमीन आहे. सतत शेतीत नवनवीन प्रयोग करून ते शेती कसतात. करांडे हे डिकसळ आश्रमशाळेत शिपाई पदावर काम करतात.

मका पिकाच्या स्पर्धेत सुमंत तुळशीराम पवार वाटंबरे, भीमराव राजाराम खर्चे लोणविरे यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

निकाल

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका