सोमाआबा मोटे यांची रासपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
२६ वर्षांचे एकनिष्ठ पक्षकार्य आले कामी
सांगोला / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे सुपुत्र, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमाआबा गुलाबराव मोटे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर यांनी आज फलटण येथे हे निवडीचे पत्र दिले.
सोमाआबा मोटे हे रासपचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून राज्यभर सुपरिचित आहेत. १९९८ सालापासून महादेव जानकर साहेब यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून ते प्रारंभीची यशवंत सेना यावेळपासून काम करीत आहेत. त्या दरम्यान २००३ पर्यंत ते याच सेनेत सक्रिय होते. त्यानंतर जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. मग येथे ही मोटे यांनी पक्ष वाढीसाठी धडाडीने काम केले.
प्रारंभी तालुकाध्यक्ष, त्यानंतर बराच कालावधी त्यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांनी मागील वर्षी राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या पदालाही यांनी न्यायचं दिला. आता यांच्यावर मोठी अशी राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज फलटण येथे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांनी राज्याच्या सरचिटणीस पदाची धुरा ही चांगल्याच प्रकारे सांभाळल्याने यांना हे गिफ्ट मिळाले आहे. गेली वर्षभरापासून ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून ही कामकाज करीत आहेत. त्यांचे मोटे नेटवर्क असून,त्यांचा विविध पक्षाशी असलेले मित्रत्वाचे नाते यात भर टाकत आहे.
कोण आहेत आबा मोटे
घेरडी गावचे सुपुत्र असलेले आबा मोटे हे एक शांत, सायमी, सतत हसतमुख तसेच प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेनुन न्याय देणारे असेच खमके नेतृत्व आहे. १९९८ साली माजी मंत्री यांच्या घरी आले अन् आबाला त्यांच्या कार्याची भुरळ पडली. त्यावेळी पासून पूर्वीची यशवंत सेवा ते आताचा राष्ट्रीय समाज पक्ष असा त्यांचा २६ वर्षाचा प्रवास तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. याच बरोबर यांनी शिक्षण क्षेत्रात जाळे पसरवीत,अनेकांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविला आहे. अनेकांना नोकऱ्या देत, त्यांच्या कुटुंबाचा उद्धार केला आहे.
२६ वर्ष एकनिष्ठ
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांना दैवत मानत यांनी पक्षाची ज्योत तेवत ठेवली आहे. प्रारंभी तालुका अध्यक्ष त्यानंतर जिल्हाध्यक्ष ते राज्य सरचिटणीस असा त्यांचा प्रवास पक्षासाठी वरदान ठरला आहे. आता तर चक्क साहेबांनी राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षची माळ त्यांच्या गळ्यात घालून जबाबदारी वाढविली आहे. याचे याच पक्षासाठीचे काम अविरत असेच राहणार आहे.
न्यायी भूमिका
सोमाआबा मोटेचे मोठे काम तालुक्याला वरदान ठरीत आहे. आज त्यांच्याकडे पहाटे पासून ते रात्री १२ पर्यंत जनतेच्या विविध कामांसाठीची गर्दी असते. त्यातून ते सर्वांना न्यायचं देतात. आता तर राज्याची जबाबदारी आल्याने यात वाढच झाली आहे. तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात यांचा जबरी वचक आहे. त्यामुळे आबा म्हटले की शंभर टक्के कामाची हमी अशीच यांची ओळख आहे.
प्रत्येक निवडणुकीत निर्णायक भूमिका
तालुक्यात विविध निवडणूकीत सोमाआबा मोटे यांची निर्णायक भूमिका अनेकांना विजयां कडेच नेणारी ठरली आहे. आता ही इथून पुढच्या निवडणुकीत यांची भूमिका ही वेगळीच असणार आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत हे करिष्माच दाखविणार आहेत.