गुन्हेगारीथिंक टँक स्पेशल

सांगोल्याच्या पत्रकाराची सोलापुरात कार पेटविली

सासुरवाडीला गेल्यावर घडला प्रकार

Spread the love

सांगोला येथील पत्रकार अरुण उर्फ ज्ञानेश्वर लिगाडे हे कुटूंबासमवेत मंगळवार, ७ मार्च रोजी दुपारी अडीच सुमारास एम एच -४५-एक्यू-४०२५ या कारमधून मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथील सासरे सुनील मुडके यांच्या घरी आले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी त्यांनी कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शन केले. देवदर्शन करून परत आल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास सदर कार सुनिल मुडके यांच्या घराच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला येथील एका पत्रकाराची सोलापूर येथे सासुरवाडीच्या घरासमोर उभी केलेली कार अज्ञात व्यक्तीने पेटविल्याची घटना नुकतीच घडली आहे. या आगीत कारचे सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील गावातील नागनाथ मंदिराजवळ घडली आहे. या घटनेत कारचे सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

दैनिक लोकमतचे सांगोला येथील पत्रकार अरुण लिगाडे यांच्या मालकीची ही कार आहे. याप्रकरणी पत्रकार अरुण उर्फ ज्ञानेश्वर भीमराव लिगाडे (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

अज्ञाताने लावलेल्या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगोला येथील पत्रकार अरुण उर्फ ज्ञानेश्वर लिगाडे हे कुटूंबासमवेत मंगळवार, ७ मार्च रोजी दुपारी अडीच सुमारास एम एच -४५-एक्यू-४०२५ या कारमधून मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथील सासरे सुनील मुडके यांच्या घरी आले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी त्यांनी कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शन केले. देवदर्शन करून परत आल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास सदर कार सुनिल मुडके यांच्या घराच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती.

रात्री कार पेटविली
रात्री जेवण झाल्यावर सर्वजण घरात झोपले होते. मोकळ्या जागेत कार पार्क केली तेव्हा ती सुस्थितीत होती. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात कोणीतरी व्यक्तीने रात्री ११:४५ च्या सुमारास त्यांची कार पेटवली.

गावातील आबा सुरवसे यांनी सदरच्या घटनेची माहिती सुनील मुंडके यांना दिली. त्यांनी झोपेतून उठून घरातून बाहेर येवून पाहिले असता गाडी पेटलेल्या अवस्थेत निदर्शनास आली. ही घटना ८ मार्च रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास मार्डी ता उत्तर सोलापूर येथील गावातील नागनाथ मंदिराजवळ घडली.

नातेवाईकांसह इतरांच्या मदतीने त्यांनी पेटलेल्या गाडीवर पाणी फवारून गाडीची आग विझवली. या आगीत कारचे जळून सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

आगीत ७ लाखांचे नुकसान
या आगीत कारचे जळून सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले. या घटनेचा तपास एएसआय श्रीमती शारदा घोळवे करीत आहेत.


हेही वाचा

शहाजीबापूंना राष्ट्रवादीच पाडणार!

शेकापमध्ये ॲड. सचिन देशमुख करणार भूकंप?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका