
सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
तुळजापूर आगाराच्या दोन एसटी बसेसवर सोलापूरजवळ दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत प्रवाशी जखमी झाले असून एसटी बसेसचेही नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, आज दुपारी बस क्रमांक MH 11 BL 9361 ही तुळजापूर आगाराची बस तुळजापूर ते सोलापूर या मार्गावर धावत होती. सोलापूर मार्गावरील कारंबा नाका डी मार्टजवळ आली अज्ञात लोकांनी बसवर दगडफेक केली. बसच्या डाव्या बाजुला प्रवाशी दरवाजावरील काचेवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने काच फुटून दोन प्रवाशांना किरकोळ जखम झाली. सदर प्रवाशांना उपचारासाठी घेऊन जात असताना ते स्वतः उपचार करतो म्हणून परस्पर निघून गेले. सदर घटनेमध्ये तुळजापूर आगाराच्या बसचे अंदाजे रुपये 2000 नुकसान झाले आहे. पुढील तपास जोडभावी पोलीस स्टेशन करीत आहेत.
दुसरी घटना सोलापूर शहरातील सम्राट चौकाजवळ घडली.
बस क्रमांक – MH 14 BT 4952 ही सोलापूर आगाराची बस सोलापूर ते सातारा या मार्गावर धावत होती. सम्राट चौकाजवळ ही बस आले असता अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. बसच्या समोरील मोट्या काचेवर अज्ञात इसमाने दगड मारल्याने रा.प.बसची समोरील मोठी काच फुटून अंदाजे रु.15000/- नुकसान झाले. यामध्ये रा.प.बसमधील कोणालाही जखम वा इजा झालेली नाही. पुढील तपास जोडभावी पोलीस स्टेशन करीत आहेत.
या दोन्ही बसेस वर दगडफेक नेमकी कोणी केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या दगडफेकीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खास मुलाखत