जवळ्याचे माजी उपसरपंच अप्पासाहेब देशमुख यांचा 88 व्या वर्षी शहाजीबापुंसाठी प्रचार

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील जवळा येथील माजी उपसरपंच आप्पासाहेबदादा देशमुख यांनी वयाच्या 88 व्या वर्षीही जवळा गावात निवडणूक प्रचारात उतरून आघाडी घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारासाठी श्री. अप्पासाहेब देशमुख हे जवळा गावात मोठ्या ताकतीने प्रचार करत आहेत.
आप्पासाहेब देशमुख यांनी जवळा ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून दमदार कामगिरी केली होती. त्यांच्या कार्यकाळात जवळा जवळा गावाच्या आजूबाजूच्या चार वाड्या एकत्र असताना त्यांनी उपसरपंच पद भूषविले. कोणताही जातीभेद न करता त्यांनी गावाचा कारभार केला होता. राजकारणाबरोबरच ते कृषी व्यवसायात रमतात. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारासाठी आप्पासाहेब देशमुख हे वयाच्या 88 व्या वर्षीही जवळा गाव पिंजून काढत आहेत.
सांगोला तालुक्यात दमदार आमदाराला पुन्हा संधी देण्यासाठी आणि सांगोला तालुक्याचे परिवर्तन करण्यासाठी शहाजी बापू पाटील यांना निवडून आणावे असे आवाहन ते करत आहेत.
शहाजीबापू पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी या दोन्ही देशमुख बंधूंनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. श्रीकांत देशमुख हे शहाजी बापू यांच्या प्रत्येक सभेमध्ये स्टार प्रचारक म्हणून आक्रमकपणे भाषण करीत आहेत.
देशमुख कुटुंबियांचा दबदबा
आप्पासाहेब देशमुख यांचे तीनही सुपुत्र राजकारणात सक्रिय आहेत. शशिकांत देशमुख हे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. जवळा गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर श्रीकांत देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सध्या ते शहाजी बापू पाटील यांच्या प्रचार सभा गाजवत आहेत. स्टार प्रचारक म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. लालासाहेब देशमुख जवळा गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत.
श्रीकांत देशमुख हे शहाजी बापू पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक आहेत. श्रीकांत देशमुख यांच्या भाषणांना शहाजी बापू यांच्या प्रत्येक सभेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे तालुकाभरात तरुण कार्यकर्त्यात तसेच जेष्ठ नागरिकांमध्ये मोठे नेटवर्क आहे. त्यांनी दोन वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे बिनविरोध सदस्य म्हणूनही ते निवडून गेले होते.
बापूंच्या प्रचारात देशमुख बंधूंची आघाडी
शहाजीबापू पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी या दोन्ही देशमुख बंधूंनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. श्रीकांत देशमुख हे शहाजी बापू यांच्या प्रत्येक सभेमध्ये स्टार प्रचारक म्हणून आक्रमकपणे भाषण करीत आहेत.