ताजे अपडेट
Trending

शिरभावी पाणीपुरवठा योजना संकटात

पावणे दोन कोटींची थकबाकी

Spread the love

दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे.

सांगोला / डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील शिरभावी ८१ गावाच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची ५८ गावांकडे गेल्या वर्षा अखेर तब्बल १ कोटी ७१ लाख ९१ हजार ४६७ रुपये झाली आहे. सध्या या योजनेचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या योजनेच्या सहा ठिकाणच्या उचल पाणीपुरवठ्याच्या नवीन पंपाचे बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे मार्च अखेरपर्यंत ही योजना पुन्हा सुरळीत सुरू राहील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

शिरभावी ८१ गावच्या पाणीपुरवठ्यामुळे सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून मार्गी लागला आहे. ऐन उन्हाळ्यातही तालुक्यातील ८२ गावांना पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाणीटंचाईचे संकट सांगोला तालुक्यावर ओढावत नाही. त्यामुळे शिरभावी व ८१ गावांची पाणीपुरवठा योजना ही सांगोला तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. परंतु ह्याच योजनेच्या थकबाकीमुळे ही योजना संकटात सापडली आहे. योजनेची डिसेंबर २०२४ अखेर थकबाकी ही १ कोटी ७१ लाख ९१ हजार ४६७ रुपये झाली आहे. अनेक गावांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे.

दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे.

शिरभावी पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी असलेली गावे पुढीलप्रमाणे (कंसात थकबाकीची रक्कम) – शिरभावी (२,७८,६८१), संगेवाडी (२,३७,९५०), मेथवडे (११,०८,८२२), मेथवडे माळी वस्ती (२,२६,७५०), देवळे (१,२९,१२२), मांजरी (८,८८,८२०), बामणी (२,६०,०३३), सावे (३,६३,०२५), धायटी (१,४२,०२३), चिंचोली (३,१८,१३१), हलदहिवडी (६४,९९१), वाकी शिवणे (२,५०,०७९), शिवणे (२,४२,७९२), खिलारवाडी (९०,४५७), महूद बु. (२५,३०,६५९), महिम (१,७९,०२१), गायगव्हाण (४१,०६२), देवकतेवाडी (२,४८,३४१), खवासपूर (४,०७,४४७), एखतपुर (८१,८३१), लोटेवाडी (२,४८,३६०), कटफळ (४२,५१२), अचकदाणी (३,०१,४४७), लक्ष्मीनगर (४,६२,७७१), सोनलवाडी (३६,४६१), बागलवाडी (१५,७४६), वाकी नरळे वस्ती (४,२४,६३८), वाकी घेरडी (५५७), वाणीचिंचाळे (१२,१९२), आलेगाव (२,५७,४९३), घेरडी (१,३९,७५७), मेडशिंगी (५१,०३६), वाढेगाव (१२,१६,१०८), राजापूर (१,०६,२०२), हबीसेवाडी (१,२४,०१८), डिकसळ (१०,४२१), हंगीरगे (१,२९,४०४), लोणविरे (६९,९२६), हणमंतगाव (११,९४४), कडलास (७६,७४४), आगलावेवाडी (६४,००८), बुरुंगेवाडी (१,१५,७७९), जवळा (१,१९,५९६), राजूरी (९,०७८), कारंडेवाडी (२,५८,३८६), तरंगेवाडी (८७,२४६), भोपसेवाडी (२,५८,८०४), नाझरे (१,१४,५०८), वझरे (३,४९,८०७), अनकढाळ (४७,५०५), अजनाळे (११९), य. मंगेवाडी (९७,९५६), गोडसेवाडी (१,३५,८८४), कमलापूर (४३,०८२),अकोला वा. (२,७६,६७८), कोळा (६,९७,५३९), बुद्धेहाळ (४८,८६२), सोमेवाडी (१,८४,९५७), जुजारपूर (३,११४९०), हायवे कोळा (२०,८९८) अशी एकूण ५८ गावांकडे तब्बल १ कोटी ५० लाख ६९ हजार ४२९ रुपयांची थकबाकी आहे.

सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा पंचायत समितीकडेही थकबाकी
शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु मंगळवेढा, पंढरपूर पंचायत समितीकडे त्यांच्याकडील थकबाकी अद्यापही भरले नाही. मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६, पंढरपूर पंचायत समिती ४३ हजार २००, सांगोला तहसिल कार्यालय २ लाख १२ हजार ६८९, सांगोला पंचायत समिती ८ लाख ७४ हजार ०२०, शेतकरी सूत गिरणीकडे ६ लाख ७६ हजार १७३, महिला सूत गिरणीकडे २३ हजार ६८०, सिहंगड कॉलेज ३ हजार ६० अशी एकूण थकबाकी १ कोटी ७१ लाख ९१ हजार ४६७ रुपये इतकी आहे.

थकबाकी भरलेली गावे
मेटकरवाडी, चिकमहुद, इटकी, मानेगाव, डोंगरगाव, सोनंद, उदनवाडी, बलवडी, चिणके, निजामपूर, वाटंबरे, वासूद, केदारवाडी, पाचेगाव बुद्रुक, गौडवाडी, चोपडी, बलवडी, नराळे, पारे, जुनोनी, हटकर मंगेवाडी, हातीद, पाचेगाव खुर्द या २५ गावांनी थकबाकी भरली आहे.

या योजनेची थकबाकी सध्या १ कोटी ७१ लाख ९१ हजार ४६७ रुपये झाली आहे. थकबाकी वेळेवर भरली तरच ही योजना पुढे सुरळीत सुरू राहणार आहे. आता उन्हाळ्याचे दिवस समोर येणार असून तालुक्यातील गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी ग्रामपंचायतीने आपल्याकडील थकबाकी भरून सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन डी. यु. नगरकर, (प्रभारी उपअभियंता, शिरभावी पाणीपुरवठा योजना) यांनी केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका